पिंपरी चिंचवड - स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दापोडी या शाळेतील सन १९७९ साला मधील दहावीच्या वर्गातील मित्रांचे गेट-टुगेदर कोकणच्या निसर्गरम्य अशा परिसरामध्ये आनंदी व उत्साही वातावरणात पार पडले या वेळी एकूण 11 मित्रांनी सहभाग घेतला.
दोन फोर व्हीलर मध्ये खोपोली अलिबाग मार्गे वर्सोली बीच जवळ रिसॉर्ट मध्ये मुक्काम केला यावेळी शाळेतील जुन्या आठवणी व प्रसंग यांना उजाळा दिला व कोकणी मेवा वेगवेगळ्या प्रकारचे मासे यांचा मनसोक्त आस्वाद घेतला यावेळी मित्रांनी जुन्या गाण्यावर नृत्य सुद्धा केली त्याचबरोबर बीचवर समुद्रामध्ये भिजण्याचा आनंद घेतला त्यानंतर अलिबाग जवळील कुलाबा किल्ल्यास भेट दिली तेथील गणेश मंदिर व तुळजाभवानी मंदिर येथे दर्शन घेतले व परत वरसोलीला रिसॉर्टवर येऊन जेवण करून पुण्याच्या दिशेने निघालो.
काही मित्र सेवानिवृत्तीनंतर आपले आयुष्य सुखा समाधान जगत असताना मैत्रीचा ओलावा निर्माण करण्यासाठी या कोकणच्या निसर्गरम्य अशा समुद्राच्या सानिध्यात गेट-टुगेदर साठी उपस्थित होते असे म्हणतात की शाळेतील मैत्री ही एकदम घट्ट व प्रेरणादायी असते. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता की एकमेकाची खुशाली जाणून घेणे सुखदुःख जाणून घेणे व गप्पा गोष्टी हास्यविनोद याच्या द्वारे जुन्या आठवणींना उजाळा देणे. अशाप्रकारे मित्रांनी मित्रासाठी निसर्गच्या सानिध्यात दिलेल्या एक दिवसाच्या गेट-टुगेदर मध्ये जगातचा विसर पडून सगळ्यांनी मित्र भेटीचा आनंद मनमुराद घेतला आलेल्या मित्रांनी कोकणातील आनंदाची शिदोरी घेऊन आपल्या घराकडे पलायन केले.

