वृत्तपत्र विक्रेता दिनी विक्रेत्यांचा सन्मान.
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - भारतरत्न, मिसाईल मॅन आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती ही वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा केली जाते. तरुणपणी ते वृत्तपत्र विक्री करायचे त्यांच्या प्रेरणेतून वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील विक्रेत्यांच्या ठिकाणी जाऊन कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी त्यांचा सन्मान करून त्यांना मिठाई भरून या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ नॅशनल हॉकर फेडरेशनच्या वतीने हा सन्मान करण्यात आला. यावेळी इरफान चौधरी, अंबालाल सुखवाल, सुशील खरात, नितीन भराटे, प्रकाश साळवे आदी उपस्थित होते.
नखाते म्हणाले साधारण मध्यरात्री अडीच, तीन वाजल्यापासून ते सकाळी अकरा वाजेपर्यंतचा हा प्रवास तांबड फुटायच्या वेळेला रस्त्यावर गर्दी नसताना सायकलवरून आणि आता दुचाकीवरून घरोघरी वृत्तपत्र वाटणाऱ्या आणि जगाची खबर पोहोचवणाऱ्या थंडी असो, ऊन असो पाऊस, वारा असो त्याची तमा न बाळगता कष्ट करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना कष्टकरी वर्गास योग्य मान मिळणे गरजेचे आहे. सरकारने अनेक वेळा वृत्तपत्र विक्रेत्यांना महामंडळ करू, महामंडळ प्रत्यक्षात आणू अशा घोषणा करून केवळ त्यांच्या तोंडाला पाणी पुसली प्रत्यक्षात महामंडळ प्रत्यक्षात अस्तित्वात आलेच नाही. या वृत्तपत्र विक्रेत्यासह सर्वच असंघटित कामगारांचे महामंडळ हे त्वरित करणे गरजेचे आहे. आम्ही यासाठी प्रयत्नशील आहोत.
२५ ते ३० वारांपासून वृत्तपत्र विक्री करणारे सुरेश (नाना ) खाटोकार, राजू कासट यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचा सत्कार करीत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.