PCMC : दिवाळीच्या पाडव्यानिमित्त मोहन नगर चिंचवड येथे सगर उत्सव संपन्न.

 


 पिंपरी चिंचवड - वीरशैव लिंगायत गवळीसमाजाच्या वतीने, सालाबाद प्रमाणे याही वर्षी सगर उत्सवाचा आयोजन करण्यात आले होते.. चिंचवड स्टेशन मोहन नगर येथे लिंगायत गवळी समाज शेकडो वर्षापासून वास्तव्यास आहे. गाई म्हशी पालन करून दुग्ध व्यवसाय करणे, हाच एक या समाजाचा प्रमुख व्यवसाय असे दूध दही ताक लोणी तूप लस्सी इ विक्री करून आपला उदरनिर्वाह करीत असे. अनेक प्रकारच्या जातीच्या म्हशी, गाई,रेडे हा समाज पाळत असतो. त्यामध्ये पंढरपुरी शिंगाळू डांग जाफराबादी इ. त्याचबरोबर प्रज्योत्पानासाठी रेडे देखील पाळत असे..

 दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पाडव्याच्या दिवशी, सगर भरवण्याची प्रथा व परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे. ज्यांच्या जीवावरती आपला संसार उदरनिर्वाह  चालतो.. अशा मुक्या प्राण्यावर हा समाज प्रेम करतो. आपल्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ करतो. पाडव्याचा दिवस हा समाजासाठी व गाई म्हशींसाठी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा दिवस असतो. या दिवशी मस्तपैकी म्हशीच्या अंगावरती पाठीवरती नक्षी काढली जाते. शिगांना रंग रंगोटी करून त्यावर बेगड चमकी लावली जाते. गळ्यामध्ये घाटी घुंगराची माळा बांधल्या जातात,कवड्याचा घोस, तसेच शिंगावर मोराची पिसे बांधले जातात. अंगावरती गुलाल भंडारा टाकला जातो.व व सगरावर जाण्यासाठी म्हशी व रेडीम्हशी व रेडे सज्ज ठेवले जातात. 


 सायंकाळी पंचमंडळी कडून सगर भरविण्यास सुरुवात होते. बहिरवाडे मिसाळ नामदे, लंगोटे, अलंकार इ. प्रमुख कारभाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, सगरा चे मानकरी असलेली चौधरी, घोंगडी अंथरूण त्यावर पूजा मांडतात. व सर्व कारभारी मंडळी आजूबाजूला बसतात... यानंतर समाजातील प्रत्येक जण म्हशी आणि घेऊन सगरावर येतात. पारंपारिक वाद्य लावून मिरवणूक काढली जाते. हल्ली अनेक जण डीजे लावून रेड्याची मिरवणूक काढतात. काही शिंगाळू जातीच्या पंढरपुरी म्हशी, म्हैस राखा जसा पळेल तसं त्याच्या पाठीमागे पळतअसतात.. काहीजण सायकल व मोटरसायकलवर बसून म्हशी ना आपल्या पाठीमागे पळवतात.. हे या दिवसाचे खास वैशिष्ट्य आहे, आपल्या धन्याचा आवाज ऐकून तो जसा पळेल तसंच त्याच्या पाठीमागे म्हशी धावत असतात.. यामध्ये आपुलकी जिव्हाळा आणि एकनिष्ठ पणा दिसून येतो.. तसेच डीजे लावून देखील रेड्याची मिरवणूक काढले जाते.. रेड्यांना सजवल्यामुळे ते दुष्टपृष्ठ आणि रुबाबदार दिसत असतात, एखाद्या कुस्ती जिंकलेल्या पैलवाना प्रमाणे त्याचे रूप दिसते.. 

 प्रत्येकाला आपल्या म्हशी व रेडे सगळ्यावर बसलेल्या चौधरी व पंचम मंडळींना सलामी देण्यासाठी व आणावे लागते. यावेळी चौधरी त्यांना मानाचा टिळा लावून, माणसांच्या वतीने त्यांचा सन्मान केला जातो.

थोडे नवीन जरा जुने