पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शहरातील सोसायट्यांची काय भूमिका असेल? याबद्दल सोसायटी फेडरेशनची विचार मंथन बैठक..

 


पिंपरी चिंचवड - येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (महानगरपालिकेच्या) निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटीधारकांची काय भूमिका असावी? स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी निवडून देताना त्या लोकप्रतिनिधीची क्षमता, योगिता, पात्रता, शिक्षण काय असावे? महानगरपालिकेमध्ये निवडून जाणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधीकडून शहरातील सोसायटीधारकांची काय अपेक्षा आहे? सोसायट्यांसाठी आणि शहरांसाठी काय जाहीरनामा असावा? या सर्व गोष्टीवर चर्चा विनिमय करण्यासाठी, सर्व सोसाट्यांमधील सभासदांना त्यांची मत व्यक्त करून. सर्वांचा सामूहिक निर्णय काय असावा? पिंपरी चिंचवड शहरातील विकासासाठी त्याचप्रमाणे सोसायटीच्या विविध प्रश्नांसाठी मनपा निवडणुकीचा जाहीरनामा काय असावा? याबद्दल चर्चा करण्यासाठी त्याचप्रमाणे सभासदांना यांचे मत व्यक्त करण्यासाठी. चिखली- मोशी- चऱ्होली - पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन च्या माध्यमातून विचार मंथन बैठक येत्या रविवारी 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता. ऐश्वर्यएम बँक्वेट हॉल, बिकानेर स्वीट मार्ट शेजारी,गोल्ड जिम समोर, फेडरेशन ऑफिसच्या समोर बोऱ्हाडेवाडी मोशी या ठिकाणी आयोजित केलेली आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये 90% मतदान हे सोसायटीधारकांचे आहे. त्यामुळे सोसायटीधारकांना त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी कसा असावा? त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत? यावर सभासदांची मतं ऐकून घेऊन फेडरेशनच्या मार्फत एक सोसायटीधारकांचा मनपा निवडणुकीसाठी अपेक्षित निवडणूक जाहीरनामा तयार करून. तसा ठराव करून या मीटिंगमध्ये जाहीर केला जाणार आहे. 

त्याचप्रमाणे सदर विचार मंथन बैठकीमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सोसाट्यांमध्ये फेडरेशन मार्फत संवाद दौरा आयोजित करून त्याचे नियोजन करून, प्रत्येक सोसायटीधारकांचे मत जाणून घेण्यात येणार आहे. 

त्यानंतर तयार होणारा सोसायटीधारकांचा निवडणूक जाहीरनामा सर्व पक्षांसाठी जाहीर केला जाणार आहे. फेडरेशन मार्फत सर्व सोसायट्यांमधील सदस्यांना आवाहन करण्यात येत आहे की ,कृपया आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे. तसेच सदर विचार मंथन बैठकीत शहराच्या विकासासाठी आपल्या असणाऱ्या कल्पना, त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधीकडून असणाऱ्या अपेक्षा याबद्दल आपले मत मांडावे असे आवाहन फेडरेशन मार्फत करण्यात येत आहे. 

प्रतिक्रिया -

पिंपरी चिंचवड शहराच्या एकूण मतदानापैकी सोसायटीधारकांचे 90 टक्के मतदान आहे ,त्यामुळे मतदानामध्ये बहुसंख्य असणाऱ्या मतदारांना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निवडून जाणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून काय अपेक्षा आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधीची काय योग्यता पात्रता असावी? याबद्दल चर्चा विनिमय करून सोसायटीधारकांच्या अपेक्षांचा जाहीरनामा सर्व पक्षांसाठी जाहीर केला जाणार आहे..

संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली- मोशी- चऱ्होली - पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन

थोडे नवीन जरा जुने