बांधकाम कामगारांच्या हक्कासाठी राज्यभर मेळावे घेण्याचा निर्धार

 


महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांचे २दिवसीय राज्यव्यापी  प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न.

पिंपरी चिंचवड/ मुंबई - महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांच्या विविध मागण्या ,प्रश्न, हक्कासाठी विविध जिल्ह्यांमध्ये मिळावे आणि सभा घेऊन जनजागृती करण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती ,कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्रच्या वतीने बदलापूर ठाणे येथे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिरात  एकमुखाने करण्यात आला.

यावेळी  समिती अध्यक्ष सागर तायडे,महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते,समिती कार्याध्यक्ष राजकुमार होळीकर, अकोल्याचे प्रशांत मेश्राम, ठाण्याचे प्रभाकर शिंदे, नवी मुंबईच्या विनीता बाळेकुंद्री, संभाजीनगरचे कमलेश दाभाडे,अशोक जाधव,साताऱ्याचे सागर कुंभार,सोलापूरचे ज्ञानेश्वर देशमुख,लातूर चे अजय कांबळे,ठाणे चे सुनील अहिरे,भंडाराचे मंगेश मोव्हे, धाराशिव चे शुभम गायकवाड, विशाल कांबळे, भंडाराचे पवन कोरतरे,मंगळवेढ्याचे प्रदीप परकाळे,नांदेडचे सुमन अग्रवाल,हिंगोलीचे नितिन घोडके,परभणीचे अशोक वाघमारे,नागपूरचे प्रमोद चव्हाण,निमंत्रक रविकांत सोनवणे,अनिल भालशंकर, मनिष शेडगे, संतोष खरात,दत्तात्रय शिरसाठ आदीसह महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगार संघटनांचे पदाधिकारी अध्यक्ष,सचिव आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये बांधकाम कामगारांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.

माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिलेले असताना सुद्धा निवडणूक आयोग आणि  महामंडळ जाणीवपूर्वक निवडणुकीच्या कालावधीमध्ये कामे प्रलंबित ठेवत असल्यामुळे त्याचा ताण पुढील काही महिन्यावरती येतो आहे तो टाळण्यात यावा. कामगारांना पडताळणीसाठी असणारे दररोज ४०ची संख्या वाढवून १०० करण्यात यावी तसेच बांधकाम कामगारांना थेट बँक खात्याद्वारे योजना देण्यात यावी, पडताळणी जलद करून तातडीने लाभ देण्यात यावेत, लोकप्रतिनिधीच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणारी समिती म्हणजे कामगार संघटनावरती गदा आणणारी असल्याने ती रद्द करावी,कामगारांना वैद्यकीय सुविधा मिळत नसून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये केवळ हॉस्पिटलचे बिल लाटण्याचा प्रकार सुरू असून त्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास आंदोलन करण्याची गरज अशा अनेक बाबीवरती प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा प्रतिनिधी यांना  येणाऱ्या अडचणीचा सामना करण्यासाठी मान्यवरांकडून व अनुभवी पदाधिकाऱ्याकडून मार्गदर्शन करण्यात आले लवकरच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये सभा आणि बैठका घेण्याचा निर्धार करण्यात आला. शिबिरात सुनील अहिरे आणि अशोक जाधव यांनी चळवळीचे गीत सादर करून उत्साह निर्माण केला. सूत्रसंचालन प्रशांत मेश्राम यांनी केले तर आभार राजेश माने यांनी मानले.


थोडे नवीन जरा जुने