राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पिंपरी-चिंचवड शहर समन्वयक पदी विलास लांडे तर कार्याध्यक्ष पदी विजय लोखंडे यांची नियुक्ती


पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा काबिज करण्याकरिता व तो अधिकाधिक मजबूत रहावा या दृष्टीकोनातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राज्यात होणाऱ्या सर्व स्थानिक  स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांच्या दृष्टीने जिल्हा समन्वय व नियोजन करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पिंपरी चिंचवड शहराकरिता मा.आमदार श्री.विलास लांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मा.सभापती, शिक्षण मंडळ श्री.विजय लोखंडे यांची पिंपरी–चिंचवड शहर कार्याध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.


पिंपरी–चिंचवड महानगरपालिका 2025-2026 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी मा. अजितदादा पवार साहेब व मा. सुनील तटकरे यांचे व पक्षाचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहचविण्याचे यशस्वी प्रयत्न करतील असे नियुक्तीची माहिती देताना शहराध्यक्ष योगेश बहल यांनी विश्वास व्यक्त केला आहे तसेच यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत,

थोडे नवीन जरा जुने