आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज वैभवी रथोत्सव हरिनाम गजरात

 


सोमवारी अलंकापुरीत संजीवन समाधी दिन सोहळा होणार साजरा 

आळंदी (अर्जुन मेदनकर) : विना,टाळ,मृदंगाचा त्रिनादासह माउली,माउली,श्रीविठ्ठल श्रीविठ्ठल,ज्ञानोबा माउली तुकाराम अशा नामगजरासह जयघोष करीत रविवारी ( दि.१६ ) हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत द्वादशी दिनी  माऊलींचा वैभवी चांदीचा मुखवटा रथोत्सवात पूजा बांधीत रथोत्सव हरिनाम गजरात प्रथा परंपरांचे पालन करीत साजरा झाला. रथोत्सव मिरवणूक ग्रामप्रदक्षिणा पुंडलिका वरदे हरी विठ्ठल चा नामजयघोष झाल्यानंतर उपस्थित भाविकांचे हात श्रींचे रथोत्सवातील रथ ओढण्यास सरसावले. सोमवारी ( दि. १७ ) आळंदीत माऊलींचा संजीवन समाधी दिन सोहळा साजरा होत असल्याचे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांनी सांगितले.

 आळंदीत ज्ञानभक्ती चैतन्यमयी वातावरण रथोत्सवात ग्रामप्रदक्षिणा मिरवणूकींने नगरप्रदक्षिणा अंतर्गत कार्तिकी वारीत रथोत्सव झाला. यावेळी रस्त्यांचे दुतर्फा उभे राहून श्रींचे दर्शन घेत भाविकांनी रथ हाताने ओढत आपली सेवा रुजू केली. तत्पूर्वी श्रींची पालखी मंदिरातून खांद्यावर घेत रथोत्सवास गोपाळपुरात परंपरेने आळंदी ग्रामस्थानी पालखी नामजयघोषात आणली. 

 आळंदीत द्वादशी दिनी रविवारी ( दि. १६ ) दुपारी श्रींचे महानैवेद्यास भाविकांना दर्शन काही वेळ बंद ठेवण्यात आले होते. श्रींचा महानैवेद्य झाल्यानंतर भाविकांना दर्शन पुन्हा सुरू झाले. तत्पूर्वी मंदिरात श्रीना पहाटे पवमान अभिषेक, दुधारती झाली. परंपरेने खेडचे प्रांत अनिल दौन्डे यांचे वतीने खेड तहसिलदार प्रशांत बेडसे यांचे हस्ते पहाटे पंचोपचार पूजा वेद मंत्र जयघोषात झाली. या वेळी अप्पर तहसीलदार जयराज देशमुख, मंडलाधिकारी प्रशांत शेटे, तलाठी सोमनाथ गावडे, संतोष वीरकर,,संजय चव्हाण, निलेश शिंदे आदी उपस्थित होते. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांचे नियंत्रणात सर्व विश्वस्त यांचे उपस्थितीत आळंदी मंदिरात धार्मिक कार्यक्रम प्रथा परंपरांचे पालन करीत उत्साहात सुरु आहेत.  

  माऊलींचे मंदिरात श्रींचा वैभवी मुखवटा फुलांनी सजलेल्या चांदीचे पालखीत पूजा बांधीत विराजमान करण्यात आला. श्रींची पालखी खांद्यावर घेत महाद्वारातून शनिमंदिर मार्गे गोपाळपुरातील श्री राधाकृष्ण मंदिरात आली. श्रीकृष्ण मंदिरात परंपरेने इनामदार कुटुंबीयांच्या वतीने श्रींची विधिवत पूजा झाली.

 रथोत्सवास पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर, स्वामी सुभाष महाराज, बाळासाहेब आरफळकर, ऋषिकेश आरफळकर, माजी नगराध्यक्ष मानकरी राहुल चिताळकर पाटील, व्यवस्थापक माऊली वीर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, उपव्यवस्थापक श्रीधर सरनाईक, श्रीचे सेवक दत्तात्रय केसरी, राजाभाऊ चौधरी ,क्षेत्रोपाध्ये इनामदार परिवार, बाळासाहेब रणदिवे चोपदार, मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे , योगेश आरु, मंगेश आरु, स्वप्नील कुऱ्हाडे, अनिल कुऱ्हाडे, उपव्यवस्थापक तुकाराम माने, श्रीधर सरनाईक, आळंदी देवस्थानचे पदाधिकारी, श्रींचे मानकरी, भाविक, वारकरी संप्रदायातील मान्यवर, आळंदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 पूजेच्या काळात परिसरातून भाविक, वारकरी, दिंडीकरी श्रींचे रथोत्सवात सहभागी होण्यास जमले होते. श्रींची पूजा होताच माउलींचा चांदीचा मुखवटा ग्रामप्रदक्षिणे साठी रथात ठेवण्यात आला. दरम्यान श्रींचे रथोत्सवास रथासमोर श्रीकृष्ण मंदिरासमोर भाविक वारकऱ्यांचे दिंडी तुन भगव्या पताका उंचावत माउली माउली‘चा गजर, श्री विठ्ठल नाम जयघोष करत रथोत्सव सुरु झाला. ग्रामप्रदक्षिणा चाकण चौक, भैरवनाथ चौक, हजेरी मारुती मंदिर, विठ्ठल रुख्मिणी चौक मार्गे हरिनाम गजरात श्रींचा वैभवी रथोत्सव साजरा झाला. मंदिरात रथोत्सवाची सांगता श्रींचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा करत झाली. मंदिर प्रदक्षिणा, धुपारती झाली. दरम्यान मंदिरात विना मंडपात हरिभाऊ बडवे ,केंदूरकर महाराज यांचे वतीने परंपरेने कीर्तन सेवा झाली. कीर्तन नंतर श्रींचे गाभाऱ्यात निमंत्रित मान्यवर यांना खिरापत प्रसाद वाटप झाला. विना मंडपात, फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसादाचे वाटप परंपरेने झाले.

अलंकापुरीत सोमवारी श्रींचा संजीवन समाधी दिन सोहळा

 संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी दिन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी परंपरांचे पालन करीत सोमवारी ( दि. १७ ) अलंकापुरी नगरीत साजरा होत आहे. या निमित्त शहरातील धर्मशाळांसह माउली मंदिर, इंद्रायणी नदी घाटावर श्रींचे संजीवन समाधी सोहळ्याचे प्रसंगावर आधारित कीर्तन सेवा होणार आहे. तत्पूर्वी माउली मंदिरात श्रीना पवमान अभिषेक व दुधारती होईल. भाविकांचे महापूजा व संत नामदेवराय यांचे वतीने श्रीना नामदास महाराज परिवाराचे वतीने महापूजा होईल. परंपरेने विना मंडप, भोजलिंगकाका मंडप, हैबतरावबाबा पायरीपुढे परंपरेने कीर्तन सेवा रुजू होईल. सकाळी दहा वाजता नामदास महाराज यांचे वंशज परंपरेने श्रींचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन होणार आहे. दरम्यान महाद्वारात काल्याचे कीर्तन त्यानंतर श्रीगुरु हैबतरावबाबा यांचे दिंडीची मंदिर प्रदक्षिणा होईल. दुपारी बाराचे सुमारास श्रींचे संजीवन समाधीवर पुष्पवर्षाव, आरती व घंटानाद होणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांना नारळ प्रसाद वाटप व महानैवेद्याने भाविकांचे दर्शनास श्रींचा गाभारा खुला होईल. सोपानकाका देहूकर यांचे वतीने विना मंडपात कीर्तन त्यानंतर हैबतरावबाबा यांचे वतीने हरिजागर होणार असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.

  द्वादशी दिनी रविवारी ( दि. १६ ) दुपारी श्रींचे महानैवेद्यास भाविकांना दर्शन काही वेळ बंद ठेवण्यात आले होते. श्रींचा महानैवेद्य झाल्यानंतर भाविकांना दर्शन पुन्हा सुरू झाले. रथोत्सव प्रसंगी आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, वाहतूक पोलीस शाखा आळंदी दिघी पोलीस अधिकारी, कर्मचारी वृंद यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करत सेवा रुजू केली. आळंदी नगरपरिषदेच्या वतीने मार्गावर विशेष स्वच्छता करण्यात आली होती. आळंदी यात्रा काळात विविध सेवाभावी संस्था, पदाधिकारी, सेवक यांनी सोहळ्यात सेवा रुजू करीत सेवाभाव जोपासला. 


थोडे नवीन जरा जुने