प्रभाग क्रमांक १२-अ (नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग ) रुपीनगर सहयोगनगर त्रिवेणीनगर तळवडे
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग १२ केंद्रस्थानी; अमोल भालेकरांच्या प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलली आहेत.
राज्यभरात महापालिका निवडणुकांचा धुराळा उडालेला असताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १२ ची लढत विशेष चर्चेत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संभाव्य दुरंगी लढतीत OBC पुरुष गटातून लोकप्रिय युवा नेतृत्व श्री. अमोल तुकाराम भालेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतल्याने निवडणुकीला वेगळीच रंगत आली आहे.
अमोल भालेकर यांच्या या निर्णयामुळे प्रभागातील सर्वच उमेदवारांची राजकीय गणिते बिघडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. B.Sc.(Chem) आणि MCM अशी शैक्षणिक पात्रता असलेले अमोल भालेकर हे प्रभागातील सर्वाधिक उच्चशिक्षित उमेदवार मानले जात आहेत.
लोकांच्या अडचणीच्या वेळी तत्काळ धावून जाणारा माणूस, संकटात ठामपणे पाठीशी उभा राहणारा भाऊ, रोखठोक व स्पष्टवक्ते नेतृत्व, उत्तम संघटक आणि रस्त्यावर उतरून काम करणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. याच गुणांमुळे ते घराघरात आणि मनामनात पोहोचले आहेत.
गेल्या १५ ते २० वर्षांपासून अमोल भालेकर प्रभागात सामाजिक व सांस्कृतिक कार्य करत असून ते परिसरात नावाजलेल्या शिवयोद्धा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष आहेत. शिवयोद्धा प्रतिष्ठाण, क्रांतिज्योत मित्र मंडळ, शिवयोद्धा वाद्यपथक, शिवयोद्धा दुर्गभ्रमंती यांसारख्या विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांनी युवक-युवतींचे मोठे संघटन उभे केले आहे. कार्यकर्त्यांची भक्कम फळी आणि जनतेच्या हक्कासाठी लढणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात त्यांनी आपल्या संघटनशक्तीचे प्रभावी प्रदर्शन करून ताकद दाखवून दिली आहे. कोणतीही प्रलोभने न देता राबवलेले सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम, रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून बेरोजगारांना काम, तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी अधिकाऱ्यांना व प्रशासनाला थेट जाब विचारणारे निर्भीड नेतृत्व म्हणून ते लोकप्रिय आहेत.
पालिकेत समाविष्ट होऊन २८ वर्षे उलटूनही नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याने यंदा “बदल हवाच” असा निर्धार प्रभागातील जनतेने केला आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढत होत असून, जनतेने स्वतःहून अमोल भालेकर यांची निवडणूक हातात घेतल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रभाग १२ मधून अमोल भालेकर विजयी ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.







