"अभिराज फाउंडेशन " मध्ये दिव्यांग दिन उत्सवात साजरा.

 


पिंपरी चिंचवड  : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त" अभिराज फाउंडेशन", वाकड या संस्थेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पूजा सरोदे  आणि अश्विनी  यमतेकर(दिव्यांग क्षेत्रातील तज्ञ व थेरपीस्ट) यांनी मुलांकडून  चित्र रंगवून घेतले. तसेच मुलांना  गाणी शिकवली. विविध  मनोरंजनात्मक खेळ घेतले.


त्यानंतर रमेश मुसुडगे यांनी 3 डिसेंबर या जागतिक दिव्यांग विषयीचे महत्व व दिव्यांगांचे विविध प्रकार व कायदे या विषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश (अप्पा) निकम आणि श्रीकांत गायकवाड औंध  यांनी मुलांसाठी खाऊ दिला. कार्यक्रमाचे  नियोजन योगिता वंजारी, विद्या रुपणाळकर, भाग्यश्री कापसे, वैशाली खेडेकर शीतल कणसे यांनी केले होते. सूत्रसंचालन  स्मिता पवार ( हांडे)व आभार प्रदर्शन अंजना चिंगरे यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने