चिखली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांना मानपत्र देऊन सन्मान

 


पिंपरी चिंचवड - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्बन सेलच्या महिला शहराध्यक्षा मनीषा गटकळ यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत, चिखली पोलीस स्टेशनचे  महिलांच्या सुरक्षेसाठी अविरत कष्ट घेणारे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल साळुंखे  यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष योगेश बहल  तसेच माजी शहराध्यक्ष अजित  गव्हाणे यांच्या हस्ते मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

 तसेच माजी महापौर  मंगला कदम,माजी नगरसेवक शाम लांडे,माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांचे हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना शाल,श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले 

सन्मानार्थी---

1) अतुल काळोखे--थरमॅक्स युनियन प्रतिनिधी

2) सुमित कोंढे--थरमॅक्स युनियन प्रतिनिधी

3) सुनील गाडे--मर्सिडीज बेंज युनियन लीडर

4) अर्चना बोरसुने--अध्यात्म आणि समाजिक कार्य

5) डॉ रामश्याम अग्रवाल--वैदयकीय, कोविड योद्धा

6) दीपमाला नंदकुमार लोहकरे--(हवालदार)महिला सुरक्षावर विशेष योगदान

इत्यादी मान्यवरांचे सन्मान करण्यात आले.

तसेच कृष्णा वाघ आणि मयुरेश वाघ निर्मित स्वरधार हा सदाबहार कार्यक्रम संपन्न झाला.


कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली,तसेच विशेष कार्यकारी अधिकारी शिवानंद चौगुले साहेब,यशवंत कन्हेरे, सुनील गाडे, निर्भया नारी मंच आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे  विशेष योगदान कार्यक्रमास लाभले.

कुशाग्र कदम,मारुती जाधव,अनिकेत बाबर, अक्षय इंगळे, अरुण चव्हाण, प्रशांत डमढेरे, युवराज बिराजदार, स्वप्नील शेंडगे, प्रदीप सपकाळ, सचिनदादा सानप, युवराज कोकाटे, युवराज पवार, सरिता नेवाळे,जना गोरे यांनी ही भेटून शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमास राष्ट्रवादी महिला कार्याध्यक्ष कविता खराडे,महिला राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी मेधा पळशीकर,आशा मराठे, ज्योतीत गोफने,निर्मला माने,संगीता कोकणे, उज्वला ढोरे,शीतल दुर्वे, अर्चना बोरसुने, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होत्या.

सामाजिक कार्यकर्ते- सर्जेराव ढेकणे, प्रकाश कांबळे, एकवले अण्णा, गुंडाराव खन्नूकर,भरत गोडगे, रमेश भांडवलकर, भुजंगराव मस्कर, सूर्यकांत मस्कर,भाऊसाहेब गायवळ ,शहाजी भोसले, बळीराम गटकळ,विकास गोरे,महेश अमृतकर,शांताराम उडाने, धकाते सर, उडाने अशोक उमक्कार, किर्ती जाधव,

मनीषा डुंबरे,वंदना जाधव,रिटा सानप,पूजा गोडगे,संगीता मस्कर,लता पिंपळे,अश्विनी गोरे,वैशाली भांडवलकर, धकाते काकी,महानंदा मिसाळ,शुभांगी ढगे,सुवर्णा वाघ,मंजू कुलकर्णी, सारिका देशमुख, मनीषा ढेकणे,अनुराधा रोमन,सिंधु भोसले, शोभा गटकळ, काजल वामन,शुभांगी उपासनी,मेधा उमक्कार,रेखा कुरलपकर, धांगेकर वहीनी, आशा चव्हाण,पिंपरे वहीनी, उषा वहीनी नामदे,असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

गेली 21 वर्ष अविरत पक्षाची विचारधारा आणि उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार  यांचे काम लोकांपर्यंत पोहचवत असताना पूर्ण वेळ पक्ष आणि लोकांच्या साठी समर्पित जीवन जगताना वॉर्ड अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, भोसरीं विधानसभा उपाध्यक्ष,भोसरीं विधानसभा दोन टर्म अध्यक्ष,दोन टर्म अर्बन सेल शहराध्यक्ष या वर यशस्वी काम करून स्वतःला सिद्ध केल्यानंतर सन्माननीय मा.महापौर,विध्यमान शहराध्यक्ष. योगेश बहल माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे,आणि माजी महापौर मंगला कदम यांचे कडे मनीषा गटकळ यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपा सभागृहात जाण्याची संधी मिळावी यासाठी आपले सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम कायम सोबत रहावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

 सदर कार्यक्रम अतिशय आनंदात आणि उत्साही वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाचे आयोजन  जयंत किसन गटकळ व डॉ. तन्मय बळीराम गटकळ यांनी केले तसेच आभार बळीराम कल्याणराव गटकळ यांनी मानले.

थोडे नवीन जरा जुने