आळंदी : येथील इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने नित्य नैमित्तीक एकादशी दिनी इंद्रायणी आरती उत्साहात करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा वारकरी सेवा महामंडळ अध्यक्ष विलास तात्या बालवाडकर यांचे हस्ते इंद्रायणी आरतीचे कोनशीलेचे पूजन पुष्पहार अर्पण करीत लोकार्पण करण्यात आले.
सौरभ शिंदे, संयोजक राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर, माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, महादेव पाखरे रोहिदास कदम, बाबासाहेब भंडारे, भागवत शेजूळ, शोभा कुलकर्णी, सरस्वती भागवत, नीलम कुरधोंडकर, अलका परदेशी, काशीबाई आडकणे, जयश्री भागवत, सुनिता निळे, सुरेखा कुऱ्हाडे, सखुबाई मुंडे, सरस्वती भागवत, लता वर्तले, पुष्पा लेंडगर, कौशल्या देवरे, सुरेखा काळभोर, मयुरी कदम, सुवर्णा काळे, मेघा काळे, संगीता चव्हाण, ज्ञानेश्वर घुंडरे, शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
