जुन्नर (रफिक शेख) : समाजसेवा, शिक्षण आणि गोरगरीबांची मदत करणारे, ज्येष्ठ समाजसेवक हाजी इस्माईल खान कागदी यांचे गुरूवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
हाजी इस्माईल खान कागदी हे हिरा इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष तसेच फाउंडर मेंबर होते. शिक्षणाच्या माध्यमातून समाज प्रगती करू शकतो, या ठाम विश्वासातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले. त्यांच्या पुढाकारातून अनेक मदरसे, शाळा सुरू झाल्या.
त्यांच्या पश्चात त्यांचा एकमेव मुलगा मोजम हाजी इस्माईल खान तसेच कुटुंबातील इतर सदस्य असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था, नागरिक व मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
.jpeg)