जुन्नर (आनंद कांबळ) : जुन्नर येथील वै. कोंडाजी बाबा डेरे आश्रमातील वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने स्वेटर वाटप करण्यात आले.
आश्रमामध्ये आदिवासी व ग्रामीण भागातील सुमारे पन्नास विद्यार्थी वारकरी शिक्षण घेत आहेत. सध्या ४० वा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. थंडीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वनिधी जमा करुन वारकरी विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप केले.
यावेळी जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमाकांत कवडे, कार्याध्यक्ष वैभव सदाकाळ, सरचिटणीस प्रभाकर दिघे, कोषाध्यक्ष अशोक बांगर, नेते विश्वनाथ नलावडे, राज्यसंघ संपर्क प्रमुख मंगेश मेहेर, भरत बोचरे, विकास मटाले, उपेंद्र डुंबरे, शिक्षक पतसंस्थेचे सभापती सचिन मुळे, संचालक रविंद्र वाजगे, विजय लोखंडे, अंबादास वामन, दिलीप लोहकरे, जितेंद्र मोरे, जिल्हा संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे, संतोष पानसरे, दिपक पानसरे, रविंद्र पानसरे, सदू मुंढे, विवेकानंद दिवेकर, राजेश दिवेकर, प्रभाकर गुंजाळ, विजय अरगडे, सुनिल घोलप, सुनिल डोळस, राम वायाळ, विठ्ठल केदारी, अनंता पारधी व अनेक संघ शिलेदार उपस्थित होते.
यावेळी तालुका संघाचे अध्यक्ष रमाकांत कवडे, शिक्षक नेते संतोष ढोबळे यांनी मनोगत व्यक्त केले. हभप. पोपट महाराज खंडागळे यांनी प्रास्ताविक तर हभप. लक्ष्मण महाराज मुरकुटे, संस्थेचे अध्यक्ष किसन नाना मेहेर यांनी सर्वांचे आभार मानले.
