घरेलू कामगारांसाठी लवकरच बैठक - अण्णा बनसोडे, उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा

 


नागपूर /पिंपरी चिंचवड,  दि.१० - महाराष्ट्र राज्यातील  लाखोंच्या संख्येने असलेल्या घरेलू कामगार यांचे अनेक प्रश्न आहेत दिवसभर  राबणाऱ्या कष्टकरी महिलांना घरेलू कामगार कल्याणकारी मंडळाच्या तर्फे न्याय, लाभ देण्यासाठी  आम्ही प्रयत्नशील राहू त्यासाठी लवकरच मुंबई येथे संबंधित  अधिकारी, विभाग संघटनेचे पदाधिकारी यांचेसमवेत लवकरच मुंबईत बैठक आयोजित करू असे आश्वासन महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज दिले. 

महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती, कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र आणि सहभागी संघटनेतर्फे  आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान शिष्टमंडळाने विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची भेट घेऊन निवेदन सादर करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

 आज राज्यस्तरीय शिष्ठमंडळाने घरेलू कामगारांना सामाजिक सुरक्षा, ई एस आय सी योजना, महामंडळाला निधीची उपलब्धता,नोंदणी जलद गतीने,व पेन्शन आदी मागण्यांबाबत लक्ष वेधले असता  अण्णा बनसोडे यांनी घरेलू कामगार यांच्या कामाबाबत व त्यांच्या सामाजिक सुरक्षा बाबत आपुलकी दाखवत त्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि सदरचा वर्ग चिकाटी व  मेहनत करणारा असून  शासनाकडून लाभ देणे आवश्यक आहे त्यासाठी आपण प्रयत्नशील राहू व त्यासाठी मुंबई येथे लवकरच बैठक आयोजित करू असे आश्वासन दिले.

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते,समितीचे राजू वंजारे, नागपूरच्या सुजाता भोंगाडे,मुंबई उपनगरचे संतोष थोरात, कसम च्या माधुरी जलमूलवार,अमरावतीच्या भाग्यश्री खडेकर, सांगलीच्या किरण कांबळे, धुळेचे शहाजी शिंदे,पुष्कराज शिरधनकर, मीरा सपकाळे,लातूरचे दशरथ जाधव,पुण्याच्या अनिता गोरे,नवी मुंबईच्या शांता खोत, निखत सय्यद,पालघरचे नितीन कुबल,विदर्भातील नितीन मेश्राम,पुष्कराज शिरधनकर, किरण साडेकर, राजू बिराजदार,राजेश माने ,लाला राठोड,सुनील भोसलेआदी पदाधिकारी उपस्थित होते

थोडे नवीन जरा जुने