पिंपरी चिंचवड : 16 डिसेंबर 2025 रोजी बालकल्याण संस्था गणेश खिंड येथे ( विशेष)दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा माय अचिव्हस चे " स्पोर्ट्स फॉर युनिक ऍथलेटिक" यांच्या माध्यमातून घेण्यात आल्या यावेळी पुणे जिल्ह्यातील विशेष (दिव्यांग )विद्यार्थ्यांनी या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये अभिराज फाउंडेशन, वाकड या शाळेतील संतोष कोळी, स्पंदन उघाडे, आमोद हांडे, शिवानंद माणिकरी या विद्यार्थ्यांनी एक गोल्ड, दोन सिल्वर व एक ब्रांझ पदक मिळवून अभिराज फॉउंडेशन ला संमिश्र यश प्राप्त करून दिले या खेळाडूंना मार्गदर्शन केले होते क्रीडा शिक्षक श्री विकास जगताप व श्री ऋषिकेष मुसूडगे तर सहकार्य केले होते सौ हांडे व कापसे यांनी या यशाबद्दल अभिराज फाउंडेशन चे डायरेक्टर स्वाती तांबे व रमेश मुसूडगे यांनी खेळाडूंचे व मार्गदर्शकाचे अभिनंदन केले.

