PCMC : आयुर्वेद जन-जनासाठी, पृथ्वीच्या कल्याणासाठी — ‘निर्विकार आरोग्य दिनदर्शिका’चे भव्य सादरीकरण

 


 चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) :  निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल भोसरी पुणे. CGHS, ECHS,केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी व सर्व विमा कंपन्यांना कॅशलेस उपचार देणारे महाराष्ट्रातील पहिले हॉस्पिटल द्वारे वैद्य निलेश लोंढे व वैद्या सारिका लोंढे यांच्या पुढाकाराने हा सलग 7 वर्ष उपक्रम राबवला जात आहे

आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने “आयुर्वेद जन-जनासाठी, पृथ्वीच्या कल्याणासाठी” या राष्ट्रीय संकल्पनेला साकार करणारा भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी गेल्या सात वर्षांपासून समाजात आयुर्वेदिक जीवनशैलीचा प्रचार-प्रसार करणाऱ्या ‘निर्विकार आरोग्य दिनदर्शिका’ या उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

हा उपक्रम आदरणीय गुरुवैद्य प्रा. शि. पवार सर आणि वैद्य संतोष सूर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, “ज्ञान आचरणात उतरले तरच ते समाजोपयोगी ठरते” या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. आयुर्वेद केवळ उपचारपद्धती नसून, सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात सहजपणे अमलात आणता येणारी जीवनशैली आहे, हा संदेश या दिनदर्शिकेद्वारे प्रभावीपणे दिला जातो.

निर्विकार आरोग्य दिनदर्शिकेत दिनचर्या, ऋतुचर्या, आहार, सुवर्णप्राशन, आजीबाईचा बटवा, सण-उत्सव व आयुर्वेद, उपवास, त्रिदोष आहार-विहार, आयुर्वेदिक पाककृती, प्रकृती परीक्षण, पंचकर्म, फॅमिली हेल्थ टार्गेट, नक्षत्रवन, प्रतिकारक्षमता परीक्षण, योग, आरोग्य शिबिरे, अभ्यंग महोत्सव तसेच मुलांसाठी खेळ व कोडी असे १८ उपयुक्त आयुर्वेदिक अध्याय समाविष्ट आहेत. हे मार्गदर्शन बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत, सर्व कुटुंबांसाठी उपयुक्त आहे.

कार्यक्रमास CGHS Beneficiary Welfare Association चे श्री ठाकूर, श्री मेनन, श्री सोमनाथन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच  वैद्य संतोष सूर्यवंशी,  श्री सचिनभैय्या लांडगे , पत्रकार वंदना कोर्टीकर, पर्यावरण प्रेमी राजीव भावसार, गुरुवैद्य प्र. शि. पवार, आर्मसिद्ध भिसे सर, पर्यावरण प्रेमी भास्कर रिकामे  आणि वैद्य निलेश लोंढे, वैद्य सारिका लोंढे  यांची मान्यवर उपस्थिती होती.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आयुर्वेदाचा स्वीकार दैनंदिन जीवनात केल्यास वैयक्तिक आरोग्यासोबतच समाज व पर्यावरणाचे आरोग्यही सुदृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला. ‘निर्विकार आरोग्य दिनदर्शिका’ हा उपक्रम आयुर्वेदाला घराघरांत पोहोचवणारा एक प्रभावी माध्यम ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व आयोजक व सहकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले

थोडे नवीन जरा जुने