पुणे महानगरपालिका | पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था : HIV जागरूकतेचा संकल्प 2025

 


पुणे : २ डिसेंबर २०२५ बुधवार पेठ, पुणे येथे रेड लाईट परिसरातील महिलांसाठी महिला मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. नीना बोराडे, आरोग्य अधिकारी, पुणे मनपा यांनी सुरक्षित समाज, निरोगी भविष्य, HIV मुक्त पुण्याकडे वाटचाल बद्दल महिलांशी संवाद साधला *डॉ. सूर्यकांत देवकर, सहा. आरोग्य अधिकारी व एड्स नोडल अधिकारी यांनी महिलांना HIV विषयी मार्गदर्शन केले.


आशा भट्ट, अध्यक्षा – मंथन फाउंडेशन यांनी 2007 ते 2025 या काळातील HIV मध्ये झालेली घट आणि सामाजिक संस्था व सरकारी यंत्रणांचे योगदान याबद्दल माहिती दिली.


कार्यक्रमात जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेचे इम्रान शेख,  अल्ताफ मुजावर, पुणे जिल्हा एड्स नियंत्रण संस्था समुपदेशक नामदेव व सागर शिंदे, दळवी हॉस्पिटल चे  समुपदेशक राम संके तसेच विविध सामाजिक संस्था प्रतिनिधी उपस्थित होत्या.

रेड लाईट क्षेत्रातील महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. 

मंथन फाउंडेशन

#WorldAIDSDay #HIVAIDSAwareness #Pune #PSCACS #PMC #ManthanFoundation #WomenEmpowerment #HealthAwareness

थोडे नवीन जरा जुने