महाराष्ट्राच्या १७ वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघात श्रेया तरस ची निवड



श्रेया तरस सर्वात लहान आणि एस. बी. पाटील पब्लिक स्कूलची पहिली राष्ट्रीय खेळाडू 

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - अहिल्यानगर, शिर्डी येथे झालेल्या विभागीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील १७ वर्षाखालील मुलींनी तृतीय क्रमांक मिळवला होता. या स्पर्धेत झालेल्या तीन डावामध्ये श्रेया तरस हिने उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजी करत अष्टपैलू खेळ केला. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुण्यातील तीन मुलींसह एकूण १६ विद्यार्थिनींची महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी (१७ वर्षाखालील मुली) निवड करण्यात आली. यामध्ये श्रेया तरस हिची देखील निवड झाली आहे. या संघात स्थान मिळवलेली श्रेया ही सर्वात कमी वयाची (१३ वर्षे ६ महिने) खेळाडू असून एस.बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे. पुढील काळात होणाऱ्या राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी मिळालेली एस. बी. पाटील पब्लिक स्कूल ची श्रेया ही पहिली राष्ट्रीय खेळाडू ठरली आहे.

    प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापक शुभांगी कुलकर्णी, क्रीडा शिक्षक चंद्रकांत ठोंबरे यांचे तिला मार्गदर्शन मिळाले.

    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी श्रेया तरस हिचे कौतुक केले पुढील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

थोडे नवीन जरा जुने