सोसायटी फेडरेशनतर्फे भव्य सर्वरोग महाआरोग्य शिबिराला उदंड प्रतिसादाची अपेक्षा


- आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विधायक उपक्रम 

- सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांची माहिती 

पिंपरी-चिंचवड - भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त चिखली–मोशी–चऱ्होली–पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन आणि विठ्ठल मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सर्व रोग महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, 14 डिसेंबरपासून ते रविवार, 21 डिसेंबरपर्यंत आठ दिवस मोफत आणि माफक दरातील उपचारांसह चालणार आहे.

शिबिराचे उद्घाटन पिंपरी चिंचवड शहरातील आदरणीय समाजसेवी व्यक्तिमत्व पद्मभूषण डॉ. गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते होणार असून, आमदार महेशदादा लांडगे विशेष उपस्थिती दर्शविणार आहेत. हे आरोग्य शिबिर विठ्ठल मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सस्ते चौक, तुपे वस्ती, पुणे-नाशिक हायवे, मोशी टोल नाक्याजवळ आयोजित केले आहे.

मोफत तपासण्यांसह तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती, शिबिरामध्ये खालील आजार व विभागांसाठी विशेष तपासणी व मार्गदर्शन उपलब्ध राहणार आहे— यामध्ये जनरल मेडिसिन,  स्त्रीरोग, मूत्ररोग, त्वचारोग, हाडांचे व मणक्यांचे विकार, कॅन्सर तपासणी, बालरोग तपासणी, जनरल सर्जरी, सी.पी.आर. मार्गदर्शन, तपासण्या मोफत तर उपचार माफक दरात देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले

‘सोसायटीधारकांसाठी आरोग्यदायी उपक्रम’ ...

“रोजच्या धकाधकीच्या जीवनात सोसायटीधारकांना स्वतःच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देता येत नाही, ज्यामुळे गंभीर व्याधी उद्भवतात. नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून सामाजिक आणि आरोग्यदायी उपक्रम म्हणून हे महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे. सर्व तज्ञ डॉक्टर येथे सेवेत असतील. सर्वांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा,” असे आवाहन पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केले.

प्रतिक्रिया : 

“सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. त्यामुळे विविध आजार दुर्लक्षित राहतात. नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, हीच भावना ठेवून आम्ही हे सर्वरोग महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे. तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती, मोफत तपासण्या आणि माफक दरातील उपचार यांचा नक्कीच मोठा लाभ होईल. सर्वांनी या उपक्रमाचा मनापासून लाभ घ्यावा,” 

संजीवन सांगळे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.

थोडे नवीन जरा जुने