सोसायटी फेडरेशनच्या सहकार संवाद कार्यक्रमाला सोसायटीधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...



PCMC : पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटी धारकांसाठी चिखली मोशी चरोली पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन यांनी रविवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सहकार संवादा कार्यक्रम आयोजित केला होता.सदर कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड शहरातील सोसायट्यांमधील 3 हजार पेक्षा अधिक कार्यकारी मंडळातील सदस्य त्याचप्रमाणे सोसायटी सभासद उपस्थित होते. 

सदर सहकार समाज कार्यक्रमामध्ये सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी सोसायटी फेडरेशनच्या स्थापने मागील भूमिका स्पष्ट केली. त्याचप्रमाणे आजपर्यंत मागील दहा वर्षांमध्ये सोसायटी फेडरेशनने केलेल्या कामाबद्दल माहिती सांगितली. त्यामध्ये सोसायट्यांना मूलभूत लागणारे पाणी उपलब्ध करून दिले. सोसायटीधारकांच्यावर लागलेले उपयोगकर्ता शुल्क स्थानिक आमदार महेश लांडगे यांच्याकडे पाठपुरावा करून महापालिका प्रशासनाबरोबर समन्वय साधून रद्द करून घेतले. सोसायटी च्या जवळ लोक वस्तीमध्ये महानगरपालिकेकडून नियोजित असणारे मोशी आणि चऱ्होली मधील कचरा संकलन वितरण केंद्र हटवले . त्याचप्रमाणे सहकारी ग्रहण संस्था अधिनियम 1960,1961नुसार सोसायटी संचालक करत असताना वेळोवेळी शिबिरे वगैरे घेऊन सोसायटीधारकांना जागृत केले. 

पिंपरी चिंचवड शहरातील 500 पेक्षा जास्त सोसायटीमध्ये या सोसायटीची कन्व्हेन्स डिड करून दिल्या. तसेच आजपर्यंत 150 पेक्षा जास्त सोसायटीमध्ये डीम्ड कन्व्हेन्स करून दिल्याची माहिती अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी दिली. 

सोसायटी ब्रिटिशांचे कायदेशीर सल्लागार ॲड. अजित बोराडे यांनी, सोसायटीचे मेंटेनन्स चे प्रकार, मेंटेनन्स थकबाकीदारांची वसुली,  डीम्ड कन्व्हेन्स , सोसायटीची निवडणूक प्रक्रिया, ऑडिट आणि टॅक्सेशन, सोसायटीचे मॅनेजमेंट कमिटीची कर्तव्य जबाबदाऱ्या आहे त्याचप्रमाणे सोसायटी सदस्यांच्या कर्तव्य जबाबदाऱ्या, याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. 

प्रमाणित लेखापरीक्षक श्री संजय काटे यांनी लेखापरीक्षण आवश्यक असल्याबाबतचे मार्गदर्शन केले. 

सदर सहकार संवाद कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून, लोकमत वृत्तपत्राचे उपसंपादक श्री ज्ञानेश्वर भंडारे म्हणून उपस्थित होते. 

त्याचबरोबर ॲड.अजित बोराडे, संजय काटे, विठ्ठल मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे संचालक श्री तानाजी मुंडे, बाबासाहेब पाटील. तसेच हजारोच्या संख्येने सोसायटीधारक उपस्थित होते.



प्रतिक्रिया: 

सोसायटी धारकांच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या अशा सहकार संवाद  कार्यक्रमाला सोसायटीधारकांनी  उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सोसायटीधारकांना सहकाराच्या अधिनियमाबद्दल माहिती व्हावी आणि सोसायटी चालवताना सोसायट्या ह्या आदर्श उपविधी नुसार  चालवाव्यात . सोसायटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाद उद्भवू नयेत. सोसायटीधारकांमध्ये सोसायटी बायलॉजी  बद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने हा संवाद कार्यक्रम ठेवला होता. भविष्यात देखील प्रत्येक महिन्याला अशा प्रकारचे कार्यक्रम फेडरेशन मार्फत घेतले जातील .. 

संजीवन सांगळे, अध्यक्ष, सोसायटी फेडरेशन

थोडे नवीन जरा जुने