एमटीएसएसडी वर्कर्स युनियनचा ७८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा


पुणे : खडकी येथील संरक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सेंट्रल एएफव्ही डेपोमधील एमटीएसएसडी वर्कर्स युनियनचा ७८ वा वर्धापन दिन शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी युनियन सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला युनियनचे अध्यक्ष सलीम सय्यद, जनरल सेक्रेटरी विशाल जी. डुंबरे, डेपोचे मुख्य प्रशासकीय अधिकारी कर्नल अजय कुंडकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार व लेखक अरुण खोरे उपस्थित होते.

वर्धापन दिनानिमित्त बोलताना प्रमुख पाहुणे अरुण खोरे यांनी कामगार चळवळीत एमटीएसएसडी वर्कर्स युनियनच्या सक्रिय सहभागाबद्दल गौरवोद्गार काढले. सध्याच्या लोकशाही व्यवस्थेत विरोधी मत मांडणाऱ्यांची गळचेपी होत असतानाही कामगार चळवळी आपल्या हक्कांसाठी ठामपणे उभ्या राहून सरकारविरोधात आवाज उठवत आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे खजिनदार तसेच जेसीएम सेकंड लेव्हल स्टाफ साईड लीडर मोहनराव होळ यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान जेकटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन इमरान शेख यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने