- भाजपा आमदार महेश लांडगे यांची मध्यस्थी
- सोसायटीधारकांनी मांडले मनःपूर्वक आभार
पिंपरी चिंचवड - भोसरी विधानसभेतील ऐश्वर्यम हमारा सोसायटीच्या फेज-1 आणि फेज-2 मधील रहिवाशांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. बिल्डरकडे पेंडिंग असलेल्या पाण्याच्या एक कोटी रुपयांच्या देयकासाठी आमदार पै. श्री महेशदादा लांडगे यांनी सक्रिय मध्यस्थी केली आणि शेवटी बिल्डरने सोसायटीस ही रक्कम देण्यास सहमती दर्शविली.
सोसायटीधारकांचे म्हणणे आहे की, “आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नांमुळेच आम्हाला आपले पाणी पुरवठ्याचे हक्क मिळू शकले. ही मदत आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.” रहिवाशांचा विश्वास आहे की या रकमेमुळे सोसायटीतील पाणीपुरवठा समस्यांचे लवकरच निराकरण होईल.
सोसायटीच्या एका प्रतिनिधीने सांगितले, “ही मदत मिळाल्याने केवळ पाणीपुरवठा सुधरेल असे नाही, तर सोसायटीच्या इतर विकासकामांसाठी देखील आर्थिक बोजा हलका होईल. सोसायटीने या यशाबद्दल आपली आनंदाची भावना व्यक्त करत भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे.
सोसायटीधारकांना भेडसावणारे प्रश्न आणि त्यांच्या मागण्या याबाबत आमदार महेश लांडगे यांनी कायम सकारात्मक भूमिका घेतली आहे. सोसायटीधारकांसाठी धोरण ठरवावे, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली होती. तसेच, सोसायटींच्या आवारात नियमबाह्य दारूविक्री दुकानांना प्रतिबंध करण्याबाबत यशस्वी पाठपुरावा केला होता.
प्रतिक्रिया :
“आमच्या रहिवाशांचे हित आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या समस्या सोडवणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. ऐश्वर्यम हमारा सोसायटीच्या पाणीपुरवठ्याच्या पेंडिंग रकमेचे समाधान झाल्याने मी खूप आनंदित आहे. सोसायटीधारकांना आपले हक्क मिळाले आहेत आणि आता पाणीपुरवठा सुरळीत चालेल. भविष्यातही रहिवाशांच्या गरजा लक्षात घेऊन प्रत्येक समस्येवर त्वरित आणि प्रभावी उपाय करणे माझी जबाबदारी राहील. हा यशस्वी मध्यस्थीचा अनुभव आमच्यासाठी एक प्रेरणा आहे की, एकत्रित प्रयत्न आणि संवादाने कोणतीही अडचण सोडवता येऊ शकते.”
— महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
