- आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास
- प्रभाग–५ सह शहरात भाजपाच्या उमेदवारांना फायदा
पिंपरी चिंचवड : भोसरी येथील आळंदी रोडवरील दुर्वांकुर लॉन्स येथे विदर्भ मित्र मंडळाच्या वतीने आयोजित फॅमिली गेट-टुगेदर व स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनातून विदर्भवासीयांनी आमदार महेश लांडगे यांच्या सक्षम व विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पार्टीला जाहीर पाठिंबा दिला.
या कार्यक्रमास कामगार नेते सचिन लांडगे व उद्योजककार्तिक लांडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच, प्रभाग क्रमांक ५ मधील इच्छुक उमेदवार अनुराधा गोफणे, सागर गवळी, कविता भोंगाळे व जालिंदर शिंदे यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी उपस्थित विदर्भवासीयांनी प्रभाग क्रमांक ५ सह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाच्या उमेदवारांना एकमुखी व बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली शहरात सुरू असलेली विकासकामे, संघटनात्मक ताकद व सर्वसामान्यांशी असलेला थेट संवाद यामुळेच ही भूमिका घेण्यात आल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिल्याने परिसरात राजकीय चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. या स्नेहसंमेलनामुळे विदर्भवासीयांचे सामाजिक ऐक्य अधिक बळकट झाले असून ‘मिशन–PCMC’ अंतर्गत भाजपाच्या संघटनात्मक मजबुतीला नवी ऊर्जा मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.
याप्रसंगी कविता भोंगाळे म्हणाल्या की, “आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहरात सातत्याने विकासाची कामे होत आहेत. विदर्भवासीयांच्या प्रश्नांना न्याय देणारे नेतृत्व म्हणून आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला भक्कम पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही एकमताने घेतला आहे.”
प्रतिक्रिया:
“पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार महेश लांडगे यांनी सातत्याने भक्कम व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व दिले आहे. रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली. विदर्भवासीयांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि रोजगाराच्या प्रश्नांबाबतही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यामुळे विदर्भ मित्र मंडळाच्या वतीने आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीला जाहीर आणि बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ सह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, यासाठी विदर्भवासीय एकजुटीने कार्य करतील, असा विशृवास आहे. सर्व विदर्भवासीयांचे आभार व्यक्त करते.
- कविता भोंगाळे, उमेदवार, भाजपा, प्रभाग- 5.

