जेट इंडिया कॉलेजच्या ट्रॅव्हल आणि टुरिझम कार्नीव्हलचे उदघाटन
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : महाराष्ट्राला लाभलेला सागरी किनारा, किल्ले,गड किल्ले, लेण्या,धार्मिक, स्थळ अशी संस्कृतीने समृद्ध असा महाराष्ट्र नटलेला आहे. पर्यटन स्थळासाठी एक देशातील विविधतेत एकतेचे उदाहरण आहे. मात्र या भूमीची पाहिजे तसे प्रमोशन होत नाही,अशी खंत महाराष्ट्र पर्यटन विभागाचे उप संचालक भरत लांघी यांनी व्यक्त केली. चिंचवड येथे आयआयबीएम संचालित जेट इंडिया कॉलेजच्या वतीने आयोजित केलेल्या वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कार्निवलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी एअर इंडिया एक्सप्रेस, पुणे एअरपोर्ट स्टेशन व्यस्थापक सनी चोपडा, एथिकल ट्रॅव्हल प्रोफेशनल असोसिएशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्ष श्वेता उंडरे,
ट्रॅव्हल एजन्सीएस असोसिएशन पुणेचे अध्यक्ष निलेश भन्साळी , जेट इंडिया कॉलेजच्या संचालिका शिरीन वस्तानी आदी मान्यवर उपस्थित होते. केंब्रिज ग्रुप ऑफ स्कूलचे अध्यक्ष धनंजय वर्णेकर यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमात 35 वेगवेगळ्या देशाची प्रकल्प, माहिती , वेशभूषा, खानपान सादर करण्यात आले होते. 150 पेक्षा जास्त पिं चिं. आणि महाराष्ट्र तील प्राचार्य उपस्थित होते त्यांचे सत्कार करण्यात आले. 3 हजार लोकसंख्येने नागरिक कार्यक्रमध्ये उपस्थित होते.
याप्रसंगी राज्यभरातील हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी शहरातील विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती तसेच भारतीय संस्कृतीच्या दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक नृत्य विद्यार्थ्यांनी सादर करून एक विविधतेचे दर्शन घडवले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीन वस्तानी यांनी केले. असा जल्लोषात हा कार्यक्रम पार पाडला.
