अभिराज फाउंडेशन मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

 


 पिंपरी चिंचवड : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन वाकड येथील अभिराज फाउंडेशन या दिव्यांग मुलांच्या शाळेत उत्सवात  साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री अमित पुरुषोत्तम पाटील( डायरेक्टर मदुराई हेरिंग अँड स्पीच क्लिनिक )श्री.सलीम सय्यद श्री अर्जुन पाटोळे ( वूई टुगेदर फाउंडेशन) पालक प्रतिनिधी श्री सिद्धार्थ उगाडे तसेच अभिराज फाउंडेशनचे डायरेक्टर श्री रमेश मुसूडगे हे उपस्थित होते प्रथम ध्वजवंदन झाले त्यानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत झाले.

 


यावेळी सामूहिक संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले, स्वातंत्र्य लढ्यातील सेनिकाच्या वेशभूषा सादर केला यावेळी श्री अमित पाटील यांनी पालकांना थेरपी व आरोग्य सुविधा या विषयी मार्गदर्शन केले श्री रमेश मुसूडगे यांनी संस्थेची माहिती व निरामय विमा योजना याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता वंजारी व वैशाली खेडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन स्मिता हांडे यांनी केले.


थोडे नवीन जरा जुने