कुपोषणमुक्तीसाठी शेवगा (recipe)

 


शेवगा (शास्त्रीय नाव: Moringa oleifera, मॉरिंगा ऑलिफेरा ; इंग्लिश: Drumstick, ड्रमस्टिक ) ही मॉरिंगेशिए कुळातल्या मॉरिंगा प्रजातीतील सर्वाधिक आढळणाऱ्या जातीची वनस्पती असून उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा हा वृक्ष १० मी. उंचीपर्यंत वाढतो. याच्या फुले, पाने तसेच शेंगांचा पाककृती बनवण्यासाठी वापर होतो.याला विदर्भातील झाडीप्रांतात मुंगना असं म्हणतात.

जसा आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी करतो तसच त्याच्या पाना पासून विविध पदार्थ बनवले जाते. जस की पानांची भाजी, शेव, चिक्की, आदी. पदार्ध बनवली जातात. शेवग्याच्या पानांची पावडर आरोघ्यास खूप गुणकारी आहे. जर आपण सकाळी अनुषा पोटी कोमत पाण्यात १ चमचा पानांची पावडर घेतली तर शेवग्याच्या पानांमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जस्त मुबलक प्रमाणात असते. या पानांमध्ये पालकापेक्षा तिप्पट लोह असते.

वाळलेल्या शेवग्याच्या बियांचे चूर्ण पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाते. तसेच शेवग्याच्या बियांपासून निघणारे तेल, म्हणजे बेन ऑइल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंत तसेच घड्याळात वंगण म्हणून वापरतात. या तेलाचा उपयोग अत्तरात करतात.

शेवग्याच्या पानांमध्ये ब जीवनसत्त्व हे तत्त्व विपुल प्रमाणात असते. त्यामुळे 'तोंड येणे' या आजारात शेवग्याच्या पानांचे आहारातून सेवन लाभदायक आहे. शेवग्याची मुळे जंतनाशक असतात.शेवगाची पाने आरोग्य वर्धक आहेत.

शेवग्याची भाजी

शेवग्याची भाजी (Drumstick Curry) ही एक अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट महाराष्ट्रीयन रेसिपी आहे, जी शेंगा, कांदा-खोबरं मसाला आणि गरम मसाल्याचा वापर करून बनवली जाते. ही भाजी रस्सा (आमटी) किंवा सुकी अशा दोन्ही प्रकारे बनवता येते, जी ज्वारी/बाजरीची भाकरी किंवा पोळीसोबत उत्तम लागते. 


झटपट रेसिपी (कृती):

तयारी: शेवग्याच्या शेंगा धुवून, साल काढून २-३ इंचाचे तुकडे करा.

मसाला: कांदा, खोबरे, लसूण, आले आणि कोथिंबीर भाजून घ्या व त्याची बारीक पेस्ट करा.

फोडणी: तेलात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि तयार मसाला परतून घ्या.

मसाले: हळद, तिखट, कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला घाला.

शिजवणे: शेंगा आणि चवीनुसार मीठ घालून वाफ काढा. रस्सा हवा असल्यास थोडे गरम पाणी घाला.

पूर्ण: शेंगा मऊ होईपर्यंत शिजवा आणि कोथिंबीर टाकून सर्व्ह करा. 

शेवग्याच्या भाजीचे फायदे:

व्हिटॅमिन ए, सी, के आणि कॅल्शियम, लोह (Iron) यांसारख्या खनिजांनी समृद्ध.

स्नायूंचे आरोग्य आणि डोळ्यांच्या दृष्टीसाठी उपयुक्त.

पचनास मदत करते.

थोडे नवीन जरा जुने