!-- afp header code starts here --> वुई टुगेदर फाउंडेशनतर्फे चिंचवड येथे निवृत्त सैनिकांचा सत्कार

वुई टुगेदर फाउंडेशनतर्फे चिंचवड येथे निवृत्त सैनिकांचा सत्कार


निवृत्त सैनिक देशप्रेम, त्याग व शिस्तीचा आदर्श आहेत– मधुकर बच्चे

भारतीय प्रजासत्ताक राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक – सलीम सय्यद

 पिंपरी चिंचवड : वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने निवृत्त सैनिकांचा सन्मान सोहळा चिंचवड येथील यशस्वी क्लासेस हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा ध्वजास सलामी देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत झाले.

कार्यक्रमात फाउंडेशनच्या सहसचिव मंगला डोळे–सपकाळे आणि महिला समन्वयक अपर्णा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली “गर्जा महाराष्ट्र माझा” हे गीत सामूहिकरित्या सादर करण्यात आले. फाउंडेशनच्या वतीने निवृत्त सैनिकांचा सत्कार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे होते. अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, “सैनिक हा देशाचा अभिमान आहे आणि तो कायम राहील. निवृत्तीनंतरही अनेक माजी सैनिक समाजसेवेत सक्रिय राहून देशसेवा करत असतात. त्यांच्या कर्तृत्वाचा, शिस्तीचा व अनुभवाचा समाजाला निश्चितच लाभ होतो. त्यामुळे अशा माजी सैनिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने स्थान दिले पाहिजे.”






संस्थेचे माजी अध्यक्ष सलीम सय्यद यांनी भारतीय प्रजासत्ताक राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. त्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगीतले. आपला देश जगात महासत्ता आहे. आपण आर्थिक प्रगती  करत आहोत. आपली सैन्य शक्ती महान आहे. असे सलीम सय्यद यांनी सांगितले.

जितेंद्र निखळ, बाबासाहेब रायकर, मल्लिकार्जुन इंगळे, बाळासाहेब राजेघाटगे, श्रीराम गोपाळ पवार, राजाराम दिगंबर आळमाळे, दिलीप चक्रे या मान्यवर निवृत्त सैनिकांचा वुई टूगेदर फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.

यावेळी सैनिकांनीही आपल्या भावना व्यक्त करत देशसेवेतील अनुभव उपस्थितांसमोर मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सलीम सय्यद यांनी केले, तर सूत्रसंचालन सहसचिव मंगला डोळे–सपकाळे यांनी केले.

कार्यक्रमास उपाध्यक्ष रवींद्र काळे, सचिव जयंत कुलकर्णी, खजिनदार दिलीप चक्रे, सल्लागार रवींद्र सागडे, खुशाल दुसाने, महिला समन्वयक अपर्णा कुलकर्णी, संस्थापक क्रांती कुमार कडूलकर यांच्यासह दारासिंह मन्हास, जावेद शेख, नंदकुमार वाडेकर, लता शिंदे, मेघना बेरी, दिलीप पेटकर, अर्जुन पाटोळे, विलास रासकर, सरिता कुलकर्णी, ओम सोनी, उदय कुलकर्णी, रोहिणी बच्चे, हनीफ सय्यद, अनिल पोरे, अनिल शिंदे, भावीन भंडारी, श्रावणी बच्चे, निलेश आकारे, शंकर कुलकर्णी, आसावरी बच्चे, विलास गटने, अशोक देशपांडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. शेवटी फाउंडेशनचे सल्लागार खुशाल दुसाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.





थोडे नवीन जरा जुने