MGID Header Code
Code End

केरळ : देशातील पहिले पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे राज्य


Kerala (किशोर थोरात) : केरळ राज्याने शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत देशातील पहिले मोफत शिक्षण देणारे राज्य होण्याचा मान मिळवला आहे. केरळ सरकारने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार आता राज्यातील विद्यार्थ्यांना स्नातक (पदवी) स्तरापर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत मिळणार आहे.

यापूर्वी केरळमध्ये इयत्ता १ ते १२ पर्यंतचे शिक्षण मोफत होते. आता या निर्णयामुळे आर्ट्स आणि सायन्स महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांचे शुल्कही रद्द करण्यात आले आहे. या निर्णयामुळे आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शिक्षण हे प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे, या भूमिकेतून केरळ सरकारने हा निर्णय घेतला असून यामुळे समान संधी, सामाजिक समता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

या ऐतिहासिक निर्णयामुळे केरळ राज्याने पुन्हा एकदा देशासमोर आदर्श निर्माण केला असून देशातील इतर राज्यांनीही केरळच्या या निर्णयातून प्रेरणा घेऊन मोफत व सर्वसमावेशक शिक्षण देण्याचा आदर्श स्वीकारावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे संपूर्ण देशात शिक्षणाचा स्तर उंचावण्यास मदत होईल.

थोडे नवीन जरा जुने