श्री. खुशाल दुसाने यांची वुई टूगेदर फाउंडेशनच्या सल्लागार पदी नियुक्ती




पिंपरी चिंचवड : चिंचवड येथील ज्येष्ठ नागरिक आणि वुई टूगेदर फाउंडेशनचे सदस्य श्री.खुशाल माधवराव दुसाने यांची वुई टूगेदर फाउंडेशनच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मागील तीन वर्षापासून ते संस्थेचे सभासद असून संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमात ते कार्यरत आहेत.

त्यांचे विविध सामाजिक संस्थांमध्ये  योगदान आहे.

सेक्रेटरी,  मेट्रोपॉलिटन जेष्ठ नागरिक संघ चिंचवड , अध्यक्ष

उद्यम नगरी हाउसिंग सोसायटी, अध्यक्ष, योगा गुड मॉर्निंग ग्रुप, सदस्य,मुख्य भक्त सेवक, गजानन महाराज सत्संग मंडळ, 

त्यांनी 38 वर्षे टाटा मोटर्स पिंपरी येथे काम केले आहे. तेथील युनियन मधील विविध उपक्रमात ते सहभागी झालेले आहेत. तसेच टेल्को मध्ये असताना टेल्को समाज विकास केंद्र कासारवाडी येथे पाच वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलेले होते.

त्यांच्या अनुभव आणि कार्यक्षमतेचा वुई टूगेदर फाउंडेशन संस्थेस सकारात्मक उपयोग होईल असे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी सांगितले. त्यांना संस्थेच्या सल्लागार पदी नेमणूक करताना खूप आनंद होत आहे, त्यांना सल्लागार म्हणून अधिकृत पत्र वुई टूगेदर संस्थे तर्फे देण्यात आले. आणि पुषगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सचिन जयंत कुलकर्णी,उपाध्यक्ष रवींद्र काळे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने