MGID Header Code
Code End

सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात नाविन्यपूर्ण शिक्षक दिन साजरा

 


विद्यार्थीच बनले शिक्षक; लोकरीच्या गुलाबांनी व्यक्त केली कृतज्ञता

सांगवी, पुणे : येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्यावतीने शिक्षक दिन मोठ्या उत्साहात व आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाची संकल्पना उपप्राचार्या व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. वंदना पिंपळे यांची होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पंडित शेळके होते. प्रमुख उपस्थिती म्हणून वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. चंदा हासे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. क्रांती बोरावके व शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. विद्या पाठारे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनीच शिक्षकाची भूमिका पार पाडणे. कु. समृद्धी चांदेरे, कु. नेहा कांबळे, कु. नयना मेश्राम, कु. श्रद्धा नवगिरे, कु. सारिका ससाने, कु. सलोनी, कु. राजश्री बचुटे, कु. आरती वैराळे आणि कु. शिवा या विद्यार्थ्यांनी Accounting, Costing व Marketing विषय शिकवून आपल्यातील अध्यापन कौशल्य दाखवले.

यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने लोकरीपासून तयार केलेल्या गुलाब पुष्पांनी सर्व प्राध्यापकांचा सत्कार केला. शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्यांच्या हस्ते डॉक्युमेंट फाईल देऊन करण्यात आला.

प्राचार्य डॉ. शेळके आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की, कमीत कमी साधनात सुंदर निर्मिती हेच वाणिज्यचे खरे तत्व आहे. पदवी म्हणजे व्यक्तिमत्वाची ओळख असून विद्यार्थ्यांनी शिस्त व सर्वांगीण विकासावर भर द्यावा.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक डॉ. अमृता इनामदार यांनी केले, सूत्रसंचालन कु. समृद्धी चांदेरे हिने केले व आभार डॉ. मनिषा त्र्यंबके यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाणिज्य विभागातील डॉ. सुभाष वाव्हळ, डॉ. रश्मी भुयान, प्रा. सुषमा सोनार, डॉ. अरबाज सय्यद व प्रा. प्रवीण खाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास ५७ विद्यार्थी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने