किशोर थोरात यांना ‘शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान

 


सिन्नर (जि. नाशिक) : संजीवनी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा ‘शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५’ आज सिन्नर येथे अध्यात्मिक व सेवाभावी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल किशोर थोरात यांना प्रदान करण्यात आला. हा मानाचा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बच्चूभाऊ कडू व माजी मंत्री रविकांत तुपकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार सोहळा संजीवनी फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर सानप यांनी सिन्नर येथे केले होते. कार्यक्रमास विविध सामाजिक, अध्यात्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किशोर थोरात यांनी हा पुरस्कार आपल्या आई चंद्रभागा व भाऊ रवींद्र मांडे यांच्या समवेत स्वीकारला. विशेष म्हणजे, हा पुरस्कार त्यांचा आतापर्यंतचा ३२ वा सन्मान ठरला आहे.

पुरस्कार स्वीकारताना किशोर थोरात यांनी भावना व्यक्त करताना सांगितले,
“हा पुरस्कार खऱ्या अर्थाने माझ्या आईचा सन्मान आहे. त्यांनी मला संस्कार देऊन घडवले आणि प्रत्येक टप्प्यावर माझ्या भावाने खंबीर साथ दिली व पत्नी सविता यांची मोलाची साथ मिळाली; त्यामुळेच मी आज या स्थानापर्यंत पोहोचू शकलो.”

किशोर थोरात यांना हा पुरस्कार अध्यात्मिक क्षेत्रात अनंतकोटी श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग ट्रस्ट मार्फत श्री स्वामी समर्थ सेवेसाठी केलेल्या कार्याबद्दल प्रदान करण्यात आला आहे. या सेवेमधून त्यांनी समाजातील अनेक गरजू व अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना आधार, मार्गदर्शन व प्रेरणा दिली असून अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य सातत्याने केले आहे.

सध्या किशोर थोरात पुढील पदांवर कार्यरत आहेत:

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ – महाराष्ट्र राज्य अध्यक्ष

आधार शैक्षणिक संस्था पुणे – सचिव

अनंतकोटी श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग ट्रस्ट – सचिव

श्री समर्थ शैक्षणिक व सामाजिक संस्था – संस्थापक अध्यक्ष

सामाजिक, शैक्षणिक व अध्यात्मिक क्षेत्रातील त्यांच्या बहुआयामी योगदानाची दखल घेत संजीवनी फाउंडेशनच्या वतीने हा सन्मान प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे किशोर थोरात यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

थोडे नवीन जरा जुने