पिंपरी चिंचवड : चिंचवड येथील ज्येष्ठ नागरिक आणि टाटा मोटर्सचे निवृत्त कर्मचारी श्री. रवींद्र विठ्ठल सागडे यांची वुई टूगेदर फाउंडेशनच्या संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मागील तीन वर्षांपासून ते संस्थेचे सभासद असून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते सातत्याने कार्यरत आहेत. संस्थेच्या सामाजिक कार्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
श्री. सागडे हे टाटा मोटर्समध्ये मेंटेनन्स विभागात कार्यरत असताना सुमारे ४० वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी कंपनीच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी समाजकार्याची वाटचाल थांबवली नाही.
निवृत्तीनंतर त्यांनी गोरगरीब व गरजू मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करून आपले सामाजिक कार्य अधिक व्यापक केले. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक वंचित कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली आहे.
शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य केल्याने गरजू विद्यार्थ्यांची शाळा व महाविद्यालयाची फी भरता येते, शैक्षणिक साहित्य (पुस्तके, गणवेश, वह्या) उपलब्ध होते, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढते, समाजात शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होते.
श्री. रवींद्र सागडे यांचे आयुष्य हे कर्तव्यनिष्ठ सेवा आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण आहे. वुई टूगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांच्या हस्ते रवींद्र सागडे यांना सल्लागार नियुक्तीचे कार्यकारिणीच्या बैठकीत देण्यात आले.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी जयंत कुलकर्णी, उपाध्यक्ष रवींद्र काळे, अपर्णा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. सेवेत असताना त्यांनी १०/१५ गरजु मुला मुलींच्या शिक्षणासाठी सतत प्रयत्न केले.
२/३ कुटुंबांना अत्यंत गरीबी तून बाहेर पडण्या साठी मदत केली, कमाई साठी काम मिळवून दिले. काहींना अक्षर ओळख करून देऊन स्वाक्षरी करावयास शिकवले.
अध्यात्माचा गाढा अभ्यास असलेले व्यक्तिमत्व,आपल्या गुरू आज्ञेत राहून गरजवंत समाजाची सेवा निस्वार्थी पणे करण्यास रवींद्र सागडे सतत तयार असतात.
