PCMC : आपले मानवाधिकार फाउंडेशन तर्फे सामाजिक कार्यकर्ते किशोर थोरात यांना प्रजासत्ताक गौरव मानवसेवा पुरस्कार २०२६


पिंपरी चिंचवड : प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वानिमित्त आपले मानवाधिकार फाउंडेशन या संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते किशोर थोरात यांना प्रजासत्ताक गौरव मानवसेवा पुरस्कार २०२६ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

किशोर थोरात हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील वंचित, गरजू, गरीब व निराधार नागरिकांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. गरजू नागरिकांसाठी अन्नदान, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, रस्त्यावरील निराधार व्यक्तींना मदत, रक्तदान शिबिरे, सामाजिक जनजागृती उपक्रम, युवक मार्गदर्शन तसेच नैतिक व अध्यात्मिक मूल्यांची जोपासना अशा विविध माध्यमांतून त्यांनी उल्लेखनीय सामाजिक कार्य केले आहे.

त्यांच्या या समाजोपयोगी कार्याची दखल घेत आतापर्यंत ३० पेक्षा अधिक सामाजिक संस्थांनी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यामधील प्रमुख पुरस्कार पुढीलप्रमाणे —

छत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार (सामाजिक कार्य – २०२५)

छत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार (अध्यात्मिक कार्य – २०२६)

(संजीवनी फाउंडेशन, संगमनेर)

विविध सामाजिक संस्थांकडून समाजरत्न पुरस्कार, समाजसेवा गौरव पुरस्कार, युवा प्रेरणा पुरस्कार इत्यादी सन्मान

डिसेंबर २०२५ मध्ये त्यांची सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड झाली असून, या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य अधिक व्यापक पातळीवर विस्तारत आहे.

“शून्यातून विश्व उभारणारे नेतृत्व” अशी ओळख निर्माण केलेले किशोर थोरात आज हजारो युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांची कार्यपद्धती, सेवाभाव, सकारात्मक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी समाजपरिवर्तनासाठी दिशादर्शक ठरत आहे.

या गौरवाबद्दल सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी किशोर थोरात यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे ,राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार आणि पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांनी किशोर थोरात यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेछा दिल्या.

थोडे नवीन जरा जुने