DYFI युवा संघटनेच्या नागपूर जिल्हा अध्यक्षपदी प्रीतम वासनिक व जिल्हा सचिव पदी अमित हटवार यांची निवड करण्यात आली.

 


भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाचे (DYFI) नागपूर जिल्हा अधिवेशन रामटेक येथे पार पडले. यावेळी युवा संघटनेचे राज्याध्यक्ष मोहन जाधव व SFI चे जिल्हाध्यक्ष संदेश रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती.

अधिवेशनात संघटनेच्या मागील कार्याचा अहवाल जिल्हा सचिव कुणाल सावंत यांनी मांडला त्याचबरोबर शिक्षण व बेरोजगारी बाबत ठराव घेऊन पारित करण्यात आले.


यावेळी जिल्हा कार्यकारणी निवडून DYFI युवा संघटनेचे राज्याध्यक्ष मोहन जाधव यांनी तीन वर्षासाठी नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून प्रीतम वासनिक, जिल्हा सचिव अमित हटवार व कोषाध्यक्ष म्हणून कृणाल सावंत यांच्यासह 11 जणांची जिल्हा कमिटी जाहीर केली.

थोडे नवीन जरा जुने