!-- afp header code starts here --> तुळजाई फौंडेशनकडून नेपाळमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

तुळजाई फौंडेशनकडून नेपाळमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

 


 पुणे :  इरा एज्युकेशन सोसायटी आर्वी (ता.भोर), तुळजाई फौंडेशन पिंपरी चिंचवड आणि ह्यमन हार्मनी यांच्या संयुक्त विद्यमाने  नेपाळची राजधानी काठमांडू थामेल येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.

 या शिवजयंती दरम्यान फ्रांस, जपान, यू ए ई, थायलंड चे राजदूत तथा युनेस्कोचे प्रतिनिधी एच ई मोहन श्रेष्ठ, नेपाळचे पंतप्रधान कार्यालयीन सचिव याम तिवारी, भारतातून आर्वी (ता भोर) येथील इरा एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ प्रसन्न देशमुख, पिंपरी चिंचवड येथील तुळजाई फाउंडेशनचे अध्यक्ष पत्रकार शिवाजी घोडे,ह्यूमन हार्मनी संस्थेचे संचालक सुरज गायकवाड, जेएसपीएम इंजीनियरिंग कॉलेजचे डॉ विठोबा तळे, प्रेमलता साळी,मोहन चिनी त्याचप्रमाणे हे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी काठमांडू येथील कार्यक्रमांमध्ये भारतासमवेत नेपाळ मलेशिया सिंगापूर चीन बांगलादेश यामधील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि शिवजयंतीच्या निमित्ताने डॉ प्रसन्न देशमुख यांनी सर्वांना छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची  यशोगाथा सांगितली. त्यामुळे शिवरायांनी केलेला पराक्रम आधुनिक काळामध्ये सुद्धा किती आदर्श आहे, याची कल्पना सर्व उपस्थितांना आली. छ. शिवाजी महाराजांनी संकटावर केलेली मात शत्रूचे प्रचंड मोठे सैन्य असताना गनिमी काव्याचा वापर करून स्वराज्याची कशी उभारणी केली.  सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन जाण्याची कला आणि स्त्रियांना देत असलेला  मान, सन्मान या सर्व गोष्टी उपस्थितांना त्यांना फार प्रेरित झाल्या. या शिवजयंतीमुळे दरवर्षी नेपाळ या ठिकाणी व विविध राष्ट्रांमध्ये शिवजयंती साजरी केली, जावी असा विचार सर्वांच्या समोर मांडला. 

यावेळेला उपस्थित मान्यवरांचे आभार श्रीमती नमिता घीमरे यांनी मानले.

थोडे नवीन जरा जुने