माऊलींचे पालखी सोहळा प्रमुख पदी ॲड. राजेंद्र उमाप

 


आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळा २०२६ साठी माजी प्रमुख विश्वस्त व विद्यमान विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांची पालखी सोहळा प्रमुख पदी निवड झाल्याची माहिती मुख्य व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली. 

 श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी च्या मार्च मधील मासिक सभेत पालखी सोहळा प्रमुख पदी निवडीसाठी बैठक झाली. या मासिक बैठकीत सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे होते. या वेळी विश्वस्त चैतन्य लोंढे, पुरूषोत्तम पाटील, ॲड. रोहिणी पवार उपस्थित होते.   

  ॲड. राजेंद्र उमाप माजी अध्यक्ष महाराष्ट्र व गोवा बार असोशिएशन, माजी विश्वस्त चिंचवड देवस्थान ट्रस्ट, जिजामाता महिला सहकारी बँक लि. च्या व्यवस्थापन समिती माजी चेअरमन व तज्ञ संचालक या पदांवर काम केले आहे. आळंदी देवस्थानचे २०२४ - २०२५ मध्ये प्रमुख विश्वस्त, सन २०१३ ला पुणे बार असोशिएशनचे अध्यक्ष होते. नुकतीच त्यांनी पुणे जिल्ह्यात दोन ठिकाणी विधी महाविद्यालये सुरु करून शैक्षणिक क्षेत्रात देखील काम सुरु केले आहे. त्यांचे निवडीचे आळंदीत स्वागत करून आळंदी जनहित फाउंडेशनचे विश्वस्त स्वामी सुभाष महाराज, अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. निवडी नंतर उपस्थित पदाधिकारी यांनी श्रींचे गाभाऱ्यात ॲड. उमाप यांचा सत्कार केला.

थोडे नवीन जरा जुने