वस्ताद विठोबा गावडे जलतरण तलाव, चिंचवडगाव येथे अनिल गावडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

 


पिंपरी चिंचवड (सलीम सय्यद) : चिंचवडगाव येथील वस्ताद विठोबा गावडे जलतरण तलावाचे व्यवस्थापक व प्रसिद्ध जलतज्ञ श्री. अनिल गावडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या मित्रपरिवारासह ज्येष्ठ नागरिकांच्या ‘डॉल्फिन स्विमिंग ग्रुप’, ‘सिल्वर स्विमर ग्रुप’ तसेच तलावाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

अनिल गावडे गेल्या दहा वर्षांपासून या जलतरण तलावाचे व्यवस्थापन सांभाळत असून, या क्षेत्रातील ते एक अनुभवी तज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यकौशल्यामुळे तलावाचे कामकाज सुरळीतपणे चालते.

यावेळी सकाळच्या पहिल्या बॅचमधील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनिल गावडे हे सर्वांशी प्रेमाने वागणारे आणि व्यवस्थापनाची उत्तम जाण असलेले व्यक्तिमत्त्व असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

तलावाचे व्यवस्थापक दिनेश राजपूत यांनी सांगितले की, “अनिल गावडे असताना मला कोणत्याही प्रकारचे टेन्शन वाटत नाही. तलाव चालवताना अनेक अडचणी येतात, त्यावेळी अनिल गावडे यांचे तसेच त्यांचे जिवलग मित्र व चिंचवड गावातील मान्यवर व्यक्तिमत्त्व श्री. विजयकुमार गावडे यांचे मोलाचे सहकार्य लाभते.”

याप्रसंगी दिनेश राजपूत यांनी सर्वांसाठी केक व चहाचे आयोजन केले होते.

थोडे नवीन जरा जुने