RRB Assistant Bharti Recruitment 2026 : रेल्वेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती मंडळामार्फत (RRB) असिस्टंट लोको पायलट (ALP) पदासाठी तब्बल ११,१२७ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १५ मे २०२६ पासून सुरू होणार असून इच्छुक उमेदवारांना १४ जून २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
या पदासाठी उमेदवार १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र किंवा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा/पदवी आवश्यक आहे.
अर्जदारांचे वय १ जुलै २०२६ रोजी १८ ते ३० वर्षे दरम्यान असावे. SC/ST उमेदवारांना ५ वर्षे तर OBC उमेदवारांना ३ वर्षांची वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.
या भरतीसाठी जनरल, ओबीसी आणि EWS उमेदवारांसाठी ₹५०० परीक्षा फी आकारण्यात येणार असून SC/ST, माजी सैनिक, ट्रान्सजेंडर, EBC आणि महिला उमेदवारांसाठी ₹२५० फी निश्चित करण्यात आली आहे.
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण भारतात करण्यात येणार आहे. परीक्षेबाबतची सविस्तर माहिती पुढे जाहीर करण्यात येणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करून या मोठ्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्वाच्या लिंक :
अधिकृत वेबसाईट - येथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठी - येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी - येथे क्लिक करा
