पश्चिम रेल्वेत ५३४९ अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती; अर्जाची अंतिम मुदत २३ मार्च

पश्चिम रेल्वेत ५३४९ अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती; अर्जाची अंतिम मुदत २३ मार्च Big recruitment for 5349 apprentice posts in Western Railway


Western Railway Recruitment 2026 : पश्चिम रेल्वे अंतर्गत ५३४९ अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २१ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी २३ मार्च २०२६ सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.

या भरतीत फिटर, वेल्डर, टर्नर, मशीनीस्ट, कारपेंटर, पेंटर, डिझेल मेकॅनिक, मोटर वाहन मेकॅनिक, COPA, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमन, रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक, प्लंबर, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), स्टेनोग्राफी (इंग्रजी) आदी विविध ट्रेड्सचा समावेश आहे.

अर्जदार उमेदवार किमान ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून संबंधित ट्रेडमध्ये ITI (NCVT/SCVT) प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. उमेदवारांचे वय २३ मार्च २०२६ रोजी १५ ते २४ वर्षे दरम्यान असावे. यामध्ये SC/ST उमेदवारांना ५ वर्षे तर OBC उमेदवारांना ३ वर्षे वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.

या भरतीसाठी जनरल आणि ओबीसी उमेदवारांसाठी ₹१०० परीक्षा फी आकारण्यात येणार असून SC/ST, PWD आणि महिला उमेदवारांसाठी फी माफ करण्यात आली आहे.

निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती पश्चिम रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यांमध्ये करण्यात येणार आहे. परीक्षेबाबतची माहिती नंतर जाहीर करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 

जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


थोडे नवीन जरा जुने