'लोकशाहीच्या मंदिराचे पिकनिक स्पॉटमध्ये रूपांतर करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध' – पिंपरी-चिंचवड भाजप आक्रमक


संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का लावल्याचा आरोप; राहुल गांधींविरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे रणशिंग

पिंपरी-चिंचवड : संसदेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि इतर खासदारांनी संसदेच्या ‘मकर प्रवेशद्वारा’चा वापर ‘पिकनिक स्पॉट’प्रमाणे केल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड भाजपच्या वतीने आज आक्रमक निदर्शने करण्यात आली. शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

नेमका वाद काय?

दिल्लीत सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान काँग्रेसच्या खासदारांनी संसदेच्या मुख्य ‘मकर प्रवेशद्वारा’जवळ एकत्र येऊन ते ठिकाण ‘पार्लमेंट पिकनिक स्पॉट’प्रमाणे वापरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने केला आहे. लोकसभा अध्यक्षांच्या स्पष्ट निर्देशांनुसार संसद परिसरातील कोणत्याही प्रवेशद्वाराजवळ धरणे, आंदोलन किंवा निदर्शने करण्यास मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन करून काँग्रेसने संसदीय शिष्टाचाराची पायमल्ली केल्याचा दावा भाजपने केला.

मोरवाडीत भाजपचे शक्तिप्रदर्शन

आज सकाळी ११ वाजता मोरवाडी येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर हे आंदोलन पार पडले. यावेळी बोलताना शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न काटे म्हणाले, “संसद हे लोकशाहीचे मंदिर आहे. मात्र राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी या पवित्र जागेचा वापर वैयक्तिक प्रसिद्धीसाठी आणि पिकनिकसारखा करत आहेत. हा केवळ नियमभंग नसून देशाच्या सर्वोच्च सभागृहाचा अवमान आहे.”

आंदोलनातील प्रमुख मुद्दे :

•  अवमान केल्याचा आरोप

• संसदीय नियम व शिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचा निषेध

• काँग्रेसवर लोकशाहीविषयी दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप

या आंदोलनात शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, संघटन सरचिटणीस श्री. मोरेश्वरभाऊ शेडगे, सरचिटणीस सौ. वैशालीताई खाड्ये, प्रदेश दक्षिण भारतीय आघाडी अध्यक्ष श्री. राजेशअण्णा पिल्ले, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. संजयभाऊ पटनी, माजी महापौर श्री. नितीनआप्पा काळजे, नगरसेवक श्री. सचिनदादा तापकीर, श्री. शितल उर्फ विजयभाऊ शिंदे, श्री. मंदारदादा देशपांडे, श्री. अमितभाऊ गावडे, नगरसेविका सौ. आरतीताई चोंधे, सौ. मनीषाताई पवार, सौ. स्नेहाताई कलाटे, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सुजाताताई पालांडे, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. दिनेशभाऊ यादव तसेच भाजपचे आजी-माजी नगरसेवक, विविध आघाड्यांचे प्रमुख, मंडल प्रमुख, शहर कार्यकारणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने