ज्ञानदीप शिष्यवृत्तीस पाच हजारांची मदत ; दिवाणे कुटुंबाचे दातृत्व
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील दिवाणे कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आळंदीतील विविध ग्रामदैवत आणि संस्था, सामाजिक उपक्रमांसाठी आर्थिक मदत करीत इतरांना प्रेरणादायी कार्य करून संदेश दिला आहे.
येथे वारकरी शिक्षणासह शालेय शिक्षण दिले जाते. आळंदीतील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणास हातभार लागावा. यासाठी सुरु करण्यात आलेल्या सुरेश वडगावकर ज्ञानदीप शिष्यवृत्ती योजनेस पाच हजार रुपयांची मदत देत आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणास सहकार्य केले आहे. कै. अंजनाबाई दिवाणे यांच्या दशक्रिया निमित्त त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे जेष्ठ चिरंजीव मनोहर दिवाणे परिवार सदस्यांनी ही देणगी संस्थेसह विविध संस्थांचे पदाधिकारी यांचे कडे सुपूर्द केली.
मनोहर दिवाणे कुटुंबीयांनी आळंदी परिसरातील विविध धार्मिक व सामाजिक संस्थांना देखील आर्थिक मदत दिली आहे. यात आळंदी नगरपरिषद अंतर्गत इंद्रायणी स्वच्छता अभियान, श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर, श्री गोविंद महाराज केंद्रे संस्था, ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक परिवार अंतर्गत उपक्रम, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आळंदी, भैरवनाथ मंदिर, श्री हजेरी मारुती मंदिर, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, स्वकुळ साली समाज ज्ञाती गृह, आळंदी दशक्रिया विधी घाट, आदींचा समावेश आहे. या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांना सहकार्य सामाजिक बांधिलकीतून करण्यात आले आहे. दिवाणे कुटुंबीयांच्या या सामाजिक योगदानाने परिसरातून कौतुक होत आहे. यातून इतर सेवाभावी संस्था आणि नागरिकांना प्रेरणादायी ठरले आहे.
