अलंकापुरीत कामदा एकादशी हरिनाम गजरात साजरी ; महाप्रसाद वाटप
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात कामदा एकादशी दिनी प्रथा परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रम हरिनाम गजरात झाले. इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने हरिनाम गजरात इंद्रायणी आरती झाली. तत्पूर्वी महाप्रसाद वाटप व श्रीगुरु हैबतबाबा दिंडीची पायी नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. श्रींचे गाभा-यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती.
भाविकांची माऊली मंदिर परिसरासह परिसरात गर्दी होतो. श्रींचे दर्शन आणि प्रदक्षिणा करीत भाविकांनी एकादशी साजरी केली. श्रीनां फराळ नैवेद्य झाला. इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता करीत भाविक, नागरिक यांनी इंद्रायणी आरती केली.
या प्रसंगी इंद्रायणी आरती सेवा समितीचे संयोजक अनिता झुजम, आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे विश्वस्त संयोजक अर्जुन मेदनकर, गोविंद ठाकूर तौर, माऊलींचे पालखी सोहळ्याचे मानकरी माऊली कुऱ्हाडे पाटील, इंद्रायणी आरती प्रसंगी स्वाती बेले, लक्ष्मीबाई बेले, विजया इसापुरे, वैभवी बेले, ओम बेले, अनिता शिंदे, शैला तापकीर, सुवर्णा काळे, मेघा काळे, कोमल चव्हाण, स्वाती चव्हाण, सखुबाई चव्हाण, सरस्वती भागवत, पुष्पा लेंडघर, रीनाताई पवार, शोभा कुलकर्णी, नीलम कुरधोंडकर, शकुताई मुंढे, राधा पगारे आदी उपस्थित होते. हरिनाम जयघोषात आरती मंगलमय वातावरणात झाली.
अलंकापुरीतून माऊलींचे पालखी सोहळ्याचे ८ जुलै ला होणार प्रस्थान
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातून आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी ८ जुलैला हरिनाम गजरात श्रींचे पालखी सोहळ्याचे वैभवी प्रस्थान होणार होणार आहे. सोहळ्यातील पहिला मुक्काम परंपरेने नऊ जुलैला होऊन आळंदीतील गांधीवाडा येथून श्रींची पालखी भल्या पहाटे पुण्यनगरी कडे दोन दिवसाच्या मुक्कामासाठी मार्गस्थ होईल. आळंदी पंढरपूर या दरम्यान होणाऱ्या पालखी सोहळ्याचे सविस्तर कार्यक्रम, निश्चित वेळापत्रक अजून तयार होत आहे. त्या नंतर सविस्तर कार्यक्रम संस्थानच्या वतीने जाहीर होणार आहे.
सोहळाच हरिनाम गजरात पंढरपूर येथे २४ जुलै रोजी पोहोचेल. २५ जुलै रोजी आषाढी एकादशी पंढरपूर येथे लाखो भाविकांचे नाम जय घोषात साजरी होत आहे. या वर्षी पालखी सोहळ्या पूर्वी दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास साजरा होणार आहे. या मुळे पालखी सोहळा ऐन पावसाळ्यात येत आहे. या अनुषंगाने नुकतीच पंढरपूर येथे बैठक पार पडली.
