UPSC Bharti : UPSC मार्फत विविध पदांच्या 1358 जागांसाठी भरती

UPSC Bharti : UPSC मार्फत विविध पदांच्या 1358 जागांसाठी भरती UPSC Bharti: Recruitment for 1358 posts of various posts through UPSC


UPSC Recruitment 2026 : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०२६ (CMS) जाहीर करण्यात आली असून यासाठीची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. या भरतीद्वारे एकूण १३५८ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२६ (सायं. ६:०० वाजेपर्यंत) निश्चित करण्यात आली आहे.

या परीक्षेद्वारे केंद्रीय आरोग्य सेवा उप-संवर्गातील सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी, रेल्वेमधील सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी, नवी दिल्ली महानगरपालिका परिषद आणि दिल्ली महानगरपालिकेतील सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी (श्रेणी-II) अशी विविध पदे भरली जाणार आहेत.

या पदांसाठी उमेदवारांकडे MBBS पदवी असणे आवश्यक आहे. अर्जदार उमेदवारांचे वय १ ऑगस्ट २०२५ रोजी ३२ वर्षांपर्यंत असावे. SC/ST उमेदवारांना ५ वर्षे तर OBC उमेदवारांना ३ वर्षांची वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.

या भरतीसाठी जनरल आणि ओबीसी उमेदवारांसाठी ₹२०० परीक्षा फी आकारण्यात येणार असून SC/ST, PWD आणि महिला उमेदवारांसाठी फी माफ करण्यात आली आहे.

निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण भारतात करण्यात येणार असून वेतन नियमानुसार देण्यात येईल. या परीक्षेचे आयोजन ०२ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीपूर्वी अर्ज करून या महत्त्वाच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

------------------------------------------------------

अधिकृत वेबसाईट - येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी - येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी - येथे क्लिक करा
------------------------------------------------------

नोकरीच्या अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा

थोडे नवीन जरा जुने