प्राथमिक ,माध्यमिक मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी


 तुमच्या शाळेतील एकल महिलांच्या मुलांना दर महिन्याला २२५० रुपये बालसंगोपन शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म मा.शिक्षण संचालक यांचे पत्रानुसार भरायचे आहेत. एप्रिल महिन्यात सत्र संपण्यापूर्वी सर्व एकल पाल्यांचे फॉर्भ रावयाचे आहेत.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेची माहिती 

1) ही शिष्यवृत्ती कोणाला मिळते?

आई किंवा वडील गमावलेल्या, कॅन्सर किंवा HIV आजार असलेल्यांची मुले, तुरुंगात कैदी असलेल्यांची मुले, *दोन्हीही* पालक ४० टक्के पेक्षा जास्त अपंग असतील तर

२) किती रक्कम मिळते ?

एकल महिलेच्या एका बालकासाठी २२५० ₹. रुपये प्रतिमहिना वयाच्या १८ वर्षापर्यंत मिळते. 

कोरोनामध्ये पालक गमावलेल्या लाभार्थी एका बालकास* दरमहा ४ हजार ₹.

(कोरोना बाधित पाल्यांसाठी वेगळा अर्ज मागावा व कोरोना मृत्यू प्रमाणपत्र जोडावे )

३) किती मुलांना शिष्यवृत्ती मिळते ?

एकल महिलेच्या दोन मुलांना ही शिष्यवृत्ती मिळते..तीन मुले असतील तर लहान दोन मुलांचे फॉर्म भरावेत म्हणजे जास्त काळ लाभ मिळेल.दुसरा पाल्य जर दुसऱ्या शाळेत असेल तरीही त्याचाही फॉर्म भरायला एकल मातेला सांगावे..

४)  उत्पन्नाची अट २.५ लाख

५) कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत...?

१)आधार कार्ड पालकांचं व बालकांचे.

२)शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र.

३)तहसीलदारांचे उत्पन्नाचे सेतुमधून प्रमाणपत्र.

४) आई/वडिलांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र

५) रहिवासी प्रमाणपत्र

६) बॅंक पासबुक (१० वर्षाचे आतील मुलांचे जॉइंट खाते चालेल पण सीडिंग हवे, १० वर्षानंतर स्वतंत्र खाते )

७) पासपोर्ट साईज मुलांचे २ फोटो

८) रेशन कार्ड झेरॉक्स 

९) घरासमोर पालक व बालकांचे अंगणवाडी सेविकेसमवेत काढलेले छायाचित्र. 

१०) ग्रामपंचायतीचे लेटरहेडवर शिफारस पत्र 

६) फॉर्म कोठे मिळतो ? कोठे जमा करायचा ?

तालुक्यातील पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास (अंगणवाडी )ऑफिसमध्ये जाऊन बालसंरक्षण अधिकारी यांच्याकडे फॉर्म मिळतो. कोरोनात मृत्यू असल्यास वेगळा फॉर्म असतो तो मागावा...

 अंगणवाडी सेविका,पर्यवेक्षिका व एकात्मिक बालविकास कार्यालय ही माहिती देऊ शकते... 

शाळेने सर्व एकत्रित भरून त्याच कार्यालयात जमा करायचे व पोहोच घ्यावी.

७)  विधवा घटस्फोटीत,परित्यक्ता महिलांच्या मुलांना कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?

विधवा --   पतीच्या मृत्यूचा दाखला

घटस्फोटीत -- कोर्टाचे कागदपत्र

परित्यक्ता -- एकटी राहत असल्याचा

ग्रामपंचायतीचा दाखला

८)  या योजनेविषयी काही अडचण असल्यास संपर्क क्रमांक 

दीपक जाधव सर( विपला फाउंडेशन) 

8975643510

 (वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ६)



 हा मेसेज तुमच्याकडे जितके आहेत त्या सर्व  शिक्षकांना पाठवा

गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख, यांना पाठवा...

थोडे नवीन जरा जुने