सीमावर्ती भागातील मराठी शाळा, शिक्षक विद्यार्थ्यांचा गौरव

 


 भालकी (जि.बिदर) : सीमेवरच्या गावांत घुमला मराठीचा जयघोष; मराठी संस्कृती व ज्ञानाची पालखी

पिंपरी चिंचवड : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठवाडा जनविकास संघ, पुणे आणि शारदा प्रतिष्ठान, भालकी (जि. बिदर) यांच्या संयुक्त विद्यमाने भालकी तालुक्यातील अट्टरगा, गुंजरगा, माणकेश्वर आणि बसवनवाडी येथील सहकारी प्राथमिक शाळांमध्ये मराठी भाषा आणि संस्कृतीचा जागर उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

या उपक्रमात सीमावर्ती भागातील मराठी शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवण्यात आला.

“अभिमान मराठीचा, उत्सव मराठी भाषेचा!” या ब्रीदवाक्याला साजेसा हा कार्यक्रम ठरला. सीमावर्ती भागात मराठी भाषा टिकवण्यासाठी कार्य करणाऱ्या शाळा व शिक्षकांना ‘सन्मान चिन्ह’ देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये

मराठी भाषेचे महत्त्व व संवर्धन यावरील प्रबोधनात्मक व्याख्यान

सीमावर्ती भागातील मराठी शाळांचा विशेष सन्मान

विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्याबद्दल जनजागृती

ग्रामस्थ व मराठीप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग


शाळांना देण्यात आलेले ग्रंथ व साहित्य

 भारताचे संविधान – लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करण्यासाठी

 ज्ञानेश्वरी – मराठी साहित्य व अध्यात्मिक वारसा जपण्यासाठी

 संत तुकाराम महाराज गाथा – अभंगातून संस्कार रुजवण्यासाठी

शैक्षणिक साहित्य – विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी

मराठी ही आपली मायबोली आहे. ती सातासमुद्रापार नेण्याबरोबरच शेजारील राज्यांतील सीमावर्ती भागात जपणे आणि वाढवणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. हा उपक्रम त्या संकल्पाला बळ देणारा ठरला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे, शाळा व्यवस्थापनाचे आणि उपस्थित मराठीप्रेमींचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.

मार्गदर्शक

श्री. अरुण श्रीपती पवार

(संस्थापक/अध्यक्ष – मराठवाडा जनविकास संघ)

विश्वस्त

डॉ. दिनकर मोरे

(शारदा प्रतिष्ठान, भालकी – जि. बिदर)

उपस्थित मान्यवर

ह. भ. प. बब्रुवाहन वाघ महाराज, श्री. सूर्यकांत कुरुलकर, श्री. दत्तात्रय धोंडगे, प्रा. रविंद्र खांडेकर, श्री. सुधाकर थिटे, श्री. किशोर अट्टर्गेकर, श्री. तुकाराम नारायणराव मोरे, श्री. हरिदेव रुद्रमणी, श्री. तुकाराम शेडोळे, श्री. अमृत अक्रे आदी मान्यवर उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने