!-- afp header code starts here --> MPSC मार्फत २७१ पदांसाठी भरती जाहीर; २० मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC मार्फत २७१ पदांसाठी भरती जाहीर; २० मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC मार्फत २७१ पदांसाठी भरती जाहीर; २० मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरू Recruitment announced for 271 posts through MPSC; Application process starts fr


MPSC Recruitment 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध पदांसाठी एकूण २७१ रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून अर्ज प्रक्रिया २० मार्च २०२६ पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ०९ एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.

या भरतीमध्ये अतिरिक्त सरकारी अभियोक्ता (गट-अ), मोटर वाहन अभियोक्ता (गट-अ) आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी / उपसंचालक (गट-अ) या पदांचा समावेश आहे.

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पदासाठी विधी पदवीसह उच्च न्यायालय किंवा त्यास दुय्यम न्यायालयात किमान ८ वर्षांचा अधिवक्ता अनुभव आवश्यक आहे. मोटर वाहन अभियोक्ता पदासाठी विधी पदवी व ‘Certificate of Practice’सह किमान ७ वर्षांचा वकील म्हणून अनुभव आवश्यक आहे. तर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी / उपसंचालक पदासाठी लष्करामध्ये मेजर किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाचे (किंवा समतुल्य) पद धारण केलेले असणे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

अर्जदार उमेदवारांचे वय १ जुलै २०२६ रोजी १८ ते ५५ वर्षे दरम्यान असावे. मागासवर्गीय, आ.दु.घ, अनाथ प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.

या भरतीसाठी खुल्या प्रवर्गासाठी ₹७१९ परीक्षा फी तर मागासवर्गीय, आ.दु.घ, अनाथ व दिव्यांग उमेदवारांसाठी ₹४४९ फी निश्चित करण्यात आली आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदासाठी ₹६७,७०० ते ₹२,०८,७००, तर मोटर वाहन अभियोक्ता पदासाठी ₹४४,९०० ते ₹१,४२,४०० इतके वेतन दिले जाणार आहे. नियुक्ती संपूर्ण महाराष्ट्रात केली जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

------------------------------------------------------

अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

------------------------------------------------------

नोकरीच्या अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा

थोडे नवीन जरा जुने