SBI Bharti : भारतीय स्टेट बँक मध्ये ११६ पदांसाठी भरती

SBI Bharti : भारतीय स्टेट बँक मध्ये ११६ पदांसाठी भरती SBI Bharti: Recruitment for 116 posts in State Bank of India


SBI Recruitment 2026 : भारतीय स्टेट बँक (SBI) अंतर्गत विविध पदांसाठी ११६ रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. विशेषतः डेप्युटी मॅनेजर (चार्टर्ड अकाउंटंट – इंटरनल ऑडिट) पदासाठी ही भरती केली जात आहे.

या भरतीसाठी उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी BSc / BE / B.Tech (Computer Science / IT / Electronics) किंवा BCA / MCA / M.Tech / MSc अशी पात्रता तसेच ३ ते ६ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. तर डेप्युटी मॅनेजर (CA) पदासाठी चार्टर्ड अकाउंटंट (CA) पात्रता व किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

अर्जदार उमेदवारांचे वय ३१ जानेवारी २०२६ रोजी २१ ते ४५ वर्षे दरम्यान असावे. SC/ST उमेदवारांना ५ वर्षे तर OBC उमेदवारांना ३ वर्षांची वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.

या भरतीसाठी जनरल, ओबीसी आणि EWS उमेदवारांसाठी ₹७५० परीक्षा फी आकारण्यात येणार असून SC/ST आणि PWD उमेदवारांसाठी फी माफ करण्यात आली आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना ₹६४,८२० ते ₹९३,९६० या वेतनश्रेणीनुसार आकर्षक पगार दिला जाणार असून नियुक्ती संपूर्ण भारतात केली जाणार आहे.

या भरतीसाठी (पद क्र.३) अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०२६ निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीपूर्वी अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

------------------------------------------------------

अधिकृत वेबसाईट  – येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी  – येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी  – येथे क्लिक करा

------------------------------------------------------

नोकरीच्या अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा

थोडे नवीन जरा जुने