श्री गणेश मंदिरात पारंपारिक होळी उत्सव उत्साहात संपन्न





पिंपरी चिंचवड (शिवानंद चौगुले) : फाल्गुन पौर्णिमेनिमित्त महात्मा फुले नगर, चिंचवड येथील श्री गणेश मंदिर येथे पारंपारिक पद्धतीने होळी उत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही धार्मिक वातावरणात होळी प्रज्वलित करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात गणरायाच्या पूजनाने व वैदिक मंत्रोच्चाराने झाली. त्यानंतर विधीपूर्वक होळी पेटविण्यात आली. प्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते तसेच परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने होळी पूजनासाठी उपस्थित होत्या. भाविकांनी होळीची परिक्रमा करून वाईट प्रवृत्तींचा त्याग व सद्गुणांचा स्वीकार करण्याचा संकल्प केला.


शहरी भागातही पारंपारिक पद्धतीने सण साजरे केले जात असल्याचे या निमित्ताने दिसून आले. मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. यशवंत कन्हेरे यांनी सांगितले की, प्रत्येक सण श्रद्धा आणि परंपरेनुसार साजरा करणे ही आपली सांस्कृतिक जबाबदारी आहे.

उत्सवात महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा संदेश देण्यात आला. संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साही वातावरणाने भारावून गेला होता.

(वार्ताहर : )

थोडे नवीन जरा जुने