आळंदीत राम जन्म उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

 


   आळंदी : आवेकर भावे रामचंद्र संस्थान ट्रस्ट राम मंदिर आळंदी देवाची या ठिकाणी गुरुवार दिनांक १९मार्च २०२६ ते गुरुवार दिनांक २६ मार्च २०२६या कालावधीमध्ये राम मंदिरात संगीत, नृत्य,भजन नारदिय कीर्तन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

रोज सकाळी ७ते ८ या वेळात वेद पाठशाला आळंदी यांच्यामार्फत रुद्र अभिषेकाचे मंत्र पठण केले जाते.त्याच बरोबर १९ तारखेपासून भरतनाट्यम डॉ. परिमल फडके परिमल परफॉर्मिंग आर्ट अँड रिसर्च सेंटरच्या विद्यार्थ्यांनी सादर केला.शब्दविणे संवादू भक्ती पूर्व वाद्य संगीत पंडित रमाकांत पराजपे,अभंग वाणी व भावगीत हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरी ताई रोकडे महाराज,राम कृष्णजी गरड महाराज,सौ मुक्ता कुलकर्णी गरसोळ,,रामलीला सई देशपांडे,गजर रामनामाचा नितीन आवेकर,सेक्सोफोन वादन श्री.संजय भावे,संतांचिया गावा राग संगीत अभंग  सौ अर्पणा केळकर,भक्ती संगीत भज मन राम अमिता घुगरी व तुषार रिठे,भजन राम पर्व ऐक ध्यास श्री हेमंत आठवले,बासरी वादन श्री अमित खरे. अभंग व भक्तीगीत  सौ ज्योती गोराणे,वारकरी भजन ह. भ.प. आबा महाराज गोडसे,शास्त्रीय वायलिन वादन सौ विद्या इंगळे व सौ.रमा चोभे आत्तापर्यंत हे कार्यक्रम राम मंदिरामध्ये संपन्न झाले आहेत या सर्वांचे आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे मुख्य विश्वस्त श्री राहुल आवेकर व विश्वस्त श्री अविनाश गुळुंजकर श्री अर्जुन मेदनकर,श्री लक्ष्मीकांत दंडनाईक,श्री चिन्मय चोभे,श्री रमेश मुसुडगे व सर्व माजी विश्वस्त यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 पुढील कार्यक्रम राम नवमीपर्यंत राम मंदिरामध्ये होणार आहे तर सर्व भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा असे विश्वस्तांनी आवाहन केले आहे.

थोडे नवीन जरा जुने