पिंपरी चिंचवड : वुई टूगेदर ही सामाजिक संस्था नेहमीच विविध कार्यक्रम एकोप्याने साजरा करत असते. यावर्षी सुद्धा संस्थेचे अध्यक्ष माननीय मधुकर बच्चे यांच्या संकल्पनेतून संस्थेत काम करणाऱ्या मुसलमान बांधव व इतर सभासदांसाठी शीरखुर्मा (Sheer Khurma) हा रमजान ईदनिमित्त बनवला जाणारा एक पारंपरिक, पौष्टिक आणि अत्यंत स्वादिष्ट गोड पदार्थ आहे. नाश्त्याचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला संस्थेचे जवळपास 60 महिला व पुरुष सभासद आवर्जून उपस्थित होते. संस्थेतर्फे सर्व सभासदांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम हा संस्थेचे सभासद बाळासाहेब जगताप यांच्या माणिक कॉलनी येथील निवासस्थानी उत्साहात पार पडला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मधुकर बच्चे म्हणाले की, ईदचा सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे 'बंधुभाव' आहे. हा सण जात-धर्म विसरून सर्वांना जवळ आणतो. या पवित्र दिवशी आपण एकमेकांबद्दलचा आदर वाढवूया आणि समाजात शांतता व एकतेचा संदेश पसरवूया.
